अमरावती Navneet Rana : अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं असताना अमरावतीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा या त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या पेक्षाही श्रीमंत असल्याचं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट झालंय.
पाच वर्षांत नवनीत राणा यांच्या संपत्तीत साडेपाच कोटी रुपयांनी वाढ : 2019 च्या निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून त्यांच्याकडं एकूण 11 कोटी 20 लाख 54 हजार 703 रुपये इतकी संपत्ती होती. आता 2024 मध्ये त्यांच्याकडं एकूण 15 कोटी 89 लाख 77 हजार 491 असल्याचं त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. यावरुन पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत साडेपाच कोटी रुपयांची वाढ झाल्याचं स्पष्ट होते.
रवी राणांकडे सात कोटी 48 लाखांची संपत्ती : नवनीत राणा यांची संपत्ती 15 कोटी 89 लाख 77 हजार 491 रुपये इतकी असताना त्यांचे पती आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्याकडं जंगम आणि स्थावर मिळून एकूण 7 कोटी 48 लाख 68 हजार 983 रुपये इतकी संपत्ती आहे. पती आणि पत्नी यांच्या संपत्तीची तुलना केली तर रवी राणा यांच्या संपत्तीच्या तुलनेत नवनीत राणा यांची संपत्ती दुप्पट आहे.
राणा दाम्पत्याकडं लाखो रुपयांची वाहनं : प्रतिज्ञापत्रानुसार, नवनीत राणा यांच्याकडं टोयाटो फॉर्च्यूनर ही 20 लाख 74 हजार रुपये किमतीची गाडी असून साडेचार लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार अशी दोन वाहनं आहेत. रवी राणा 14 लाख 53 हजार रुपये किमतीची स्कॉर्पिओ क्लासिक आणि 40 लाख 24 हजार रुपयांची एमजी ग्लॅस्टॉर कार आहे. नवनीत राणा यांच्याकडं सोन्या चांदीचे एकूण 55 लाख 37 हजार रुपयांचे दागिने आहेत.
हेही वाचा :