ETV Bharat / politics

"शपथविधी जनमताने नाही तर ईव्हीएमच्या आशीर्वादानं"; सुषमा अंधारेंची जोरदार टीका - SUSHMA ANDHARE

आज पुण्यातील विधानभवन येथे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीनं सरकार तसेच ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आलं.

Mahavikas Aghadi  Andolan
देवेंद्र फडणवीस आणि सुषमा अंधारे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2024, 10:28 PM IST

पुणे : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. आज देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, असं असताना हे सरकार जनमताचा कौल म्हणून अस्तित्वात आलं नाही तर, ईव्हीएमच्या आशीर्वादानं आलं आहे अशी भूमिका महाविकास आघाडीनं घेतली आहे. आज पुण्यातील विधानभवन बाहेर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं.

शपथविधी जनमताने होत नाही तर ... : यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, "आजचा शपथविधी जनमतानं होत नाही तर ईव्हीएमच्या आशीर्वादानं झाला आणि हे सरकार आलं. ईव्हीएमच्या मताच्या चोरीतून आलेलं हे सरकार आहे. हे आंदोलन राज्यभर आम्ही पोहोचवू. जनतेने देखील आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. एकनाथ शिंदे यांचे रूसवे फुगवे म्हणजे एका अर्थाने ड्रामेबाजी सुरू आहे. ईव्हीएमवरून लक्ष हटवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस रुसव्या फुग्व्याच नाटक करत आहेत.

महाविकास आघाडीचं आंदोलन (ETV Bharat Reporter)

"महायुतीचा शपथविधी जनमतानं नाही तर ईव्हीएमच्या आशीर्वादानं झाला. ईव्हीएमच्या मताच्या चोरीतून आलेलं हे सरकार आहे. या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत. हे आंदोलन आम्ही राज्यभर पोहोचवणार आहे. तसेच जनतेने देखील आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं." - सुषमा अंधारे, नेत्या शिवसेना (उबाठा)

सरकार केली जोरदार टीका : "उदय सामंत यांना जर आज सांगितलं की, उपमुख्यमंत्री पद तुम्हाला देवू तर एका मिनिटात हे एकनाथ शिंदे यांना सोडून जातील. हे सगळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील गद्दारी करतील. एकनाथ शिंदेंना गृहखातच काय इतर खाते देखील मिळण्याची मारामार आहे. यांना खात्याचं पडलं आहे राज्याच्या जनतेच नाही", असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सरकार जोरदार टीका केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

हेही वाचा -

  1. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केलं अभिनंदन; म्हणाले, "सरकार चुकतंय, गृहीत धरतंय असं जर..."
  2. राजकीय जीवनात शांत, संयमी देवेंद्र फडणवीस कसे होते शाळेत? शाळेतील वर्गमित्रांनी सांगितल्या फडणवीसांच्या आठवणी
  3. देवाभाऊंचं मित्रांसाठी मॉडेलिंग फोटोसेशन; पाहा मुख्यमंत्र्यांचे फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.