ETV Bharat / politics

महायुती, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच; आजी-माजी नव्हे तर नवख्यांचीही नावं चर्चेत - Vidhan Sabha Election 2024 - VIDHAN SABHA ELECTION 2024

Vidhan Sabha Election 2024 : सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडं लागलंय. सर्वात ताकदवान नेता म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडं पाहिलं जातं. मुख्यमंत्र्यांच्या हातात राज्याचा कारभार असतो. त्यामुळं हे पद मिळावं, अशी सर्वच राजकीय पक्षांची इच्छा असते. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबतचा सस्पेन्स महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही कायम आहे.

Vidhan Sabha Election 2024
महायुती, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2024, 6:18 PM IST

मुंबई Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडं लागलंय. महायुतीकडून सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली. सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबतचा सस्पेन्स महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही कायम आहे. दोघांनीही अजून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्या की जुन्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबत आता चर्चा सुरू आहेत.

नवे चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वेगवेगळी समीकरणं तयार झाली. महाविकास आघाडीच्या नावानं राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. अवघ्या अडीच वर्षांनंतर भाजपानं महाविकास आघाडीला सुरुंग लावत, शिवसेना फोडून राज्यात युतीचं सरकार स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यामुळं गेल्या पाच वर्षांत राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये झालेली फूट आणि राजकीय नेत्यांचा डावपेच यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात अराजकता निर्माण झाली. मात्र, या सर्व घडामोडीत आजी, माजी मुख्यमंत्री आणि महत्त्वाकांक्षी नवे चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं पाहायला मिळतंय.

...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील, अशी विधानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वारंवार केली जात आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते संजू भोर पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटला आहे, त्यामुळं राज्यात महायुतीचं सरकार आल्यास एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील."

उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांच्या राजकीय खेळीतून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मुख्यमंत्रिपदी राहून त्यांनी कोरोना काळात काम केलं. त्यामुळं विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाऊ शकतात. तसंच उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील, असं ठाकरे गटाकडून सांगितलं जातंय.

"मी पुन्हा येईन..". म्हणणारे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युतीचं सरकार स्थापन झालं. राज्य विधिमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन..." असं विधान केलं होतं. मात्र ,2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानं त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं. मात्र, दोन वर्षांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं, मात्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीनं त्यांना हुलकावणी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा जिंकणार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशा भावना भाजपाच्या गोटातून व्यक्त केल्या जात आहेत.

सुप्रिया सुळेंचं नाव चर्चेत : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचंही मुख्यमंत्रिपदासाठी नाव चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असल्याचे बॅनर झळकले होते. त्यामुळं सुप्रिया सुळे यांचंही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दिसत आहे.

महाविकास आघाडीत वाद : महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षानंही मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकलाय. नाना पटोले यांना मुख्यमंत्रिपद द्यावं, अशी भावना पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षात सध्या मुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळं काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार आल्यास नाना पटोले यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार का? हे पाहावं लागेल.

दिग्गज नावांची चर्चा : सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदासाठी दिग्गज नावांची चर्चा आहे. भाजपाचा विचार केला, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा नेते विनोद तावडे, विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नावं चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांचीही मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा आहेत.

दिल्लीतून ठरवला जाणार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा : ज्येष्ठ राजकीय पत्रकार हेमंत देसाई म्हणाले की, "महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सरकार स्थापनेच्या दृष्टीनं रणनीती आखली जात आहे. त्यामुळं मुख्यमंत्रिपदी कोण असेल याचा निर्णय निवडणुकीच्या निकालानंतरच घेतला जाऊ शकतो. महायुतीचा विचार करता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपाचे ज्येष्ठ नेते दिल्लीतून ठरूवू शकतात. त्यामुळं महायुतीत कोणताही गोंधळ होणार नाही, असं वाटतं. मात्र, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यासाठी चुरस असणार आहे. 2024 च्या निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रिपदासाठी नवा चेहरा मिळणार की जुना चेहराच मुख्यमंत्री होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.

हेही वाचा

  1. 'शिवतीर्थ'वरील मनसेची बैठक सोडून राज ठाकरे 'वर्षा'वर शिंदेंच्या भेटीला; मुंबईत घडामोडींना वेग - Vidhan Sabha Election 2024
  2. "काँग्रेसकडून नाना पटोले मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार"; काँग्रेस आमदाराचा दावा - Nana Patole CM Post
  3. सिनेट निवडणुका अराजकीय व्हाव्यात, भाजपाच्या आशिष शेलार यांची इच्छा - Mumbai University Senate Election

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.