ETV Bharat / politics

अदानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शरद पवारांचे कानावर हात, शिंदे-पवार भेटीवरुन तापलं राजकारण - Sharad Pawar Meets Eknath Shinde - SHARAD PAWAR MEETS EKNATH SHINDE

Eknath Shinde Sharad Pawar Meeting : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आठवड्यात दोनदा भेट झाल्याच्या राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण मोठ्या वेगानं बदलत असताना ही भेट महत्त्वाची मांडली जात आहे. तर या भेटीदरम्यान अदानी समूहाचे दोन अधिकारी उपस्थित असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याबाबत शरद पवार यांनी साफ कानावर हात ठेवले आहेत.

Adani Group 2 officials also present during Eknath Shinde Sharad Pawar meeting political leaders reaction on it
एकनाथ शिंदे आणि शरद पवार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 9:42 PM IST

मुंबई Eknath Shinde Sharad Pawar Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट झाली. या भेटीमागे साखर कारखानदारांच्या थकहमीचा विषय असल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे. या भेटीनंतर थकहमीबाबत यशस्वी चर्चा झाल्याचं ही पवारांनी म्हटलंय. मात्र, या भेटीदरम्यान अदानी उद्योग समूहाचे दोन अधिकारी उपस्थित असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलंय.

शिंदे-पवार भेटीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

मविआतील काँग्रेस आणि शिवसेनेचा धारावीला विरोध : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाला विरोध आहे. धारावीकरांना योग्यरित्या पुनर्वसित केलं जात नसल्याचा आरोप करत या दोन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मात्र, असं असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळं शरद पवारांच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

वरून दोस्ती आतून कुस्ती : या संदर्भात बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "वास्तविक शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळं काही लोकांच्या पोटात दुखायला लागलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहेत. ते या भेटीमागचा वेगळा अर्थ काढत आहेत. एकीकडं वरून दोस्ती दाखवायची आणि आतून कुस्ती करायची, अशीच संजय राऊत यांची प्रवृत्ती आहे. तुमच्या मित्र पक्षातील नेत्यांनाच तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहात. उद्योगपतींचे लाड कोणी पुरवले? हे अंबानीच्या लग्नात नुकतंच दिसून आलंय", असंही वाघमारे म्हणाल्या.

पवार यांच्या भेटीतील चर्चेबद्दल माहिती नाही : या संदर्भात बोलताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले की, "शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट कोणत्या कारणासाठी झाली? याची आपल्याकडं माहिती नाही. मात्र, महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मुद्द्यावर तापलेलं वातावरण शांत करण्याच्या उद्देशानं शरद पवार यांची ती भेट होती. या पलीकडं काही वेगळ्या उद्देशानं भेट असेल तर त्याची आपल्याला कल्पना नाही," असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची माहिती नाही : शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान अदानी समूहाचे दोन अधिकारी उपस्थित होते, अशी जरी प्रत्यक्षात चर्चा झाली. यावर शरद पवार यांनी म्हटले, "आपल्या भेटीदरम्यान कोणीही अधिकारी उपस्थित नव्हतं. आपण गेल्यानंतर जर अदानी समूहाचे कोणी अधिकारी आले असतील तर त्याबद्दल आपल्याला कल्पना नाही," असं सांगत शरद पवार यांनी अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत साफ कानावर हात ठेवलेत.

हेही वाचा -

  1. मुंबईत धारावीच्या नावाखाली 'लँड जिहाद' सुरू- संजय राऊत - Sanjay Raut
  2. शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा; राज्यात राजकीय भूकंप होणार? - Sharad Pawar Met CM Eknath Shinde

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.