ETV Bharat / politics

महाराष्ट्रात धक्कादायक निकाल; 'या' उमेदवारांना दाखवला घरचा रस्ता, निकालाचं विश्लेषण वाचा एका क्लिकवर - Lok Sabha Election 2024 Results - LOK SABHA ELECTION 2024 RESULTS

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचे देशभरातल्या ५४३ जागांचे निकाल आणि कल एव्हाना स्पष्ट झाले आहेत. यात महाराष्ट्रातल्या ४८ जागांचासुद्धा समावेश आहे. लोकसभा निवडणूक निकाल २०२४ चा अन्वयार्थ काय? हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

Lok Sabha Election Results 2024
लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 9:23 PM IST

हैदराबाद Lok Sabha Election Results 2024 : एक बाब अगदी सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ आहे. महाराष्ट्रातल्या काही जागांचे निर्णय हे धक्कादायक होते. अर्थात असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र एक खरं. निर्णय धक्कादायक असले तरीही संभाव्य धक्क्याचा अंडरकरंट सर्वसामान्य मतदारांना जाणवत होता. जाणवणार नाही कसा? याचे कर्ते आणि करविते ‘मतदारच’ तर आहेत. ‘मत’वाले मतदार!. या निवडणुकीत ‘एनडीए’ विरुद्ध ‘इंडिया’ आघाडी म्हणजे महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना होता. यात सरशी निःसंदेहपणे ‘इंडिया’ आघाडीने साधली. राज्यातल्या अनेक जागांच्या बाबतीत ‘होत्याचं नव्हतं’ आणि ‘नव्हत्याचं होतं’ झालं.

बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना दिली पंसती : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम घडवू शकणाऱ्या काही ठराविक जागांपुरतं बोलू या. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या मतदारसंघामध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी ‘पॉवर’फुल लढत होती. राष्ट्रीय राजकारणात साडेपाच दशकं दबदबा राखणारे शरद पवार यांच्या खासदार कन्येला, सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून आव्हान मिळालं. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक चिन्हासह कायदेशीररित्या मिळवणाऱ्या अजित पवार यांचं आव्हान सुप्रिया सुळे यांनी परतवून लावलं. लाखाहून अधिक मताधिक्याने त्या विजयी झाल्या. मुलगी की सून? या प्रश्नाचं बारामतीकरांनी ‘मुलगी’ हे उत्तर फायनल करत पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना लोकसभेत पाठवलं. सुप्रिया सुळे यांच्या या विजयानं केंद्रातल्या राजकारणात त्यांना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावायला मिळू शकते. सुप्रिया सुळे प्रतिनिधित्व करत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष इंडिया आघाडीचा घटक आहे, मग केंद्रात सुप्रिया सुळे यांना संधी कशी मिळणार?

‘चारसौ पार’ चा नारा : भाजपाप्रणित एनडीएला देशभरात अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यानं भाजपासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. वरकरणी जरी भाजपा सत्तास्थापन करु शकते, असं भासत असलं तरी निवडणूक प्रचारात ‘चारसौ पार’ चा नारा देणाऱ्या पक्षातल्या धुरिणांसाठी सत्तास्थापन करणं वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही. निवडणूक निकालाचा कल लक्षात घेऊन ‘इंडिया’ आघाडीनं सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव सुरु केली. शरद पवार यांना अर्थातच त्यात मह्त्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.

शरद पवार यांची भूमिका निर्णायक असणार : बिहारचे मुख्यमंत्री आणि जेयुडीचे अध्यक्ष नितीश कुमार यांना आपल्याकडं वळवण्याची जबाबदारी शरद पवार यांच्याकडं देण्य़ात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे याबाबत संभ्रम कायम राहील अशी भूमिका घेतली आहे. नितीश कुमार यांच्याशी आपली चर्चा झाली नाही, हे सांगताना ती होणारच नाही, असं पवार म्हणालेले नाहीत. शिवाय या विषयावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेता सीताराम येचुरी यांच्याशी चर्चा झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. थोडक्यात येत्या काही दिवसांत या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर हालचाल झाल्याची पहायला मिळू शकतं आणि यात शरद पवार यांची भूमिका निर्णायक असणार आहे. हे गणित जुळलं तर अर्थातच स्वतः शरद पवार आणि त्यांची खासदार कन्या सुप्रिया सुळे यांना ‘लाभाचं पद’ मिळेल, हे वेगळं सांगायला नको.

विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात कोण यशस्वी होतं? हा सुद्धा कळीचा प्रश्न होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे या मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते. त्यांचा सामना विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी होता. राऊत यांनी शिवसेनेच्या तिकिटावर राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना दोनदा हरवत खासदारकी जिंकली होती. नारायण राणे हे तडफदार नेता म्हणून ओळखले जात असले तरीही लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. शिवाय याआधी लढलेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांची राज्यसभेची मुदतही संपत आली आहे. जर या निवडणुकीत विजय मिळाला नसता तर त्यांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा झाली असती.

नारायण राणे यांचा विजय : विनायक राऊत हे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर न जाता उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. त्यामुळं राणे विरुद्ध राऊत हा सामना अनुभव विरुद्ध निष्ठा यांच्यात होता. यात प्रदीर्घ राजकीय अनुभव म्हणजे नारायण राणे यांचा विजय झाला. या विजयानंतर राणे यांचं राज्यातलं मह्त्त्व पुन्हा वाढलं आहे. शिवाय राणे यांच्या विजयामुळे कोकणातून पहिल्यांदाच (लोकसभेत) भाजपाचं ‘कमळ’ फुललं आहे. या विजयामुळे राणे यांना मिळालेला आत्मविश्वास त्यांच्या पक्षासाठीही कमालीचा उपयुक्त ठरणार आहे. केंद्रात सत्तास्थापनेबाबतीत ‘जर-तर’च्या परिस्थितीत राणे यांचं दिल्लीत असणं परिणामकारक ठरणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे ‘ठाणेदार’ पदी कायम : ठाणे हा शिवसेनेचा गड मानला जातो. राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा ठाण्याचेच. इथेच दिवंगत आनंद दिघे यांनी शिवसेना वाढवली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत खुलं बंड करत शिंदे यांनी संपूर्ण शिवसेनाच ‘धनुष्य बाण’ या पक्षचिन्हासह आपल्या नावे केली. या परिस्थितीत इतर जागांबरोबरच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं होतं ‘ठाणे’ राखणं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवडत्या ठाण्यात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कधीकाळचे शिंदे यांचे मित्र, सहकारी आणि विद्यमान खासदार राजन विचारे शिवसेना (उबाठा)च्या तिकिटावर निवडणुकीला उभे राहिले. मुळात शिंदे यांनी ठाण्यातून उमेदवार द्यायला विलंब केला. त्यातून त्यांनी दिलेले नरेश म्हस्के हे उमेदवार दुबळे समजले जात होते. विचारे विरुद्ध म्हस्के लढतीत विजय विचारेंचाच होणार, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं मात्र घडलं उलटंच. नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांना तब्बल दोन लाखांहून अधिक मतांनी मात दिली. या निकालामुळं मुख्यमंत्री शिंदे ‘ठाणेदार’ पदी कायम आहेत, हे सिद्ध झालं. आता पुन्हा ठाणे जिंकण्यासाठी उद्धव यांच्यासाठी प्रचंड आव्हानात्मक असणार आहे.

दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विजयी : दक्षिण मुंबईत अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार अरविंद सावंत जिंकून आले. शिवसेनेकडून दोनदा जिंकलेले सावंत उद्धव ठाकरे यांच्याच पक्षात राहिले आणि त्यांना निष्ठेचं पारितोषिकही मिळालं. ‘भाषाप्रभू’ अरविंद सावंत यांचा बुलंद आवाज उद्धव ठाकरे यांची भूमिका लोकसभेत मांडण्यात मह्त्त्वाची भूमिका बजावणार आहे.

धक्कादायक निकालाची नोंद : दक्षिण मध्य मुंबईतही धक्कादायक निकालाची नोंद झाली. शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले विद्यमान खासदार राहुल शेवाळे पुन्हा जिंकतील, यात राजकीय अभ्यासकांनाही शंका नव्हती. राहुल शेवाळे यांच्या गाठीशी नगरसेवक, खासदार म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. शिवाय मतदारसंघाची उत्तम जाणही आहे. राहुल शेवाळे हे मावळत्या लोकसभेत शिवसेनेचे गटनेता होते. विशेष म्हणजे शिवेसेनेचं मुख्यालय असलेलं ‘शिवसेना भवन’ही त्यांच्याच मतदारसंघात आहे. शेवाळे यांच्या तुलनेत फील्डवर कामाचा कमी अनुभव, मात्र हुशार, बुद्धिजीवी अनिल देसाई दुबळे उमेदवार मानले जात होते. मात्र त्यांनी निवडून येण्याची करामत करुन दाखवली. सावंत यांच्याप्रमाणेच देसाई अभ्यासू आहेत. उत्तम वक्ता आहेत. भविष्यात ‘इंडिया’ आघाडीत उद्धव यांना मोठी जबाबदारी मिळाल्यास अनिल देसाई यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जावू शकते.

या उमेदवारांना घरचा रस्ता : या निवडणुकीत रावसाहेब दानवे (जालना), नवनीत राणा (अमरावती), भारती पाटील (दिंडोरी), डॉ. हीना गावित, डॉ. सुजय विखे पाटील (अहमदनगर), उज्ज्वल निकम (उत्तर मध्य मुंबई) या विजयाची खात्री देणाऱ्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवत मतदारांनी ‘आम्हाला गृहीत धरू नका,’ हा संदेश ईव्हीएम मार्फत दिला. हे सर्व नेते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पक्षासाठी आवश्यक रसद पुरवू शकणारे होते. आता सर्वांसमोरचं आव्हान बिकट झालं आहे. आता ‘शो मस्ट गो ऑन’ च्या थाटात यांच्या दिल्लीत असण्याशिवाय आणि त्यांच्या ऐवजी इतर महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींनी असण्यासह, महाराष्ट्राला दिल्लीचं तख्त राखून दाखवावं लागणार आहे.

हेही वाचा -

  1. बीडमध्ये बजरंग सोनावणे आघाडीवर; फेरमतमोजणी करण्याची पंकजा मुंडेंची मागणी - Maharashtra lok Sabha election
  2. राज्यातील महाविकास आघाडीनं एनडीएचं वाढविलं टेन्शनं, वाचा विजयी उमेदवारांची यादी - maharashtra lok sabha 2024 winner list
  3. कोकणात नारायण राणेंचा डंका; विनायक राऊतांचा पराभव, नितेश राणेंकडून जल्लोष - Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.