ETV Bharat / politics

महायुतीला का हवेत राज ठाकरे? 'मनसे'च्या इंजिनला स्पीड आलाय की महायुतीत घोळ झालाय? - MNS Mahayuti Assembly Elections

MNS Mahayuti Assembly Elections : लोकसभा निकालानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकांचं वेध लागलं आहे. प्रत्येत पक्षानं तयारी सुरू केली आहे. कोण कोणासोबत अन् कुठून लढणार याची चर्चा आता रंगायला सुरुवात झाली. कोणाला कोणाची गरज आहे यावरही प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेबाबतही महायुतीमध्ये असंच काहीसं चित्र आहे. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर....

Raj Thackeray On Assembly Elections
राज ठाकरे आणि महायुती (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 10:02 PM IST

मुंबई MNS Mahayuti Assembly Elections : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच अटळ संघर्ष दिसतो आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांकडं अन्य राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत. तर राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला असला तरी, राज ठाकरे यांनी महायुतीसोबत यावं, अशी अपेक्षा महायुतीतील नेते करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढली आहे, की महायुती लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून सावरलेली नाही, जाणून घेऊया तज्ञांची मते.

प्रतिक्रिया देताना आनंद परांजपे आणि अनिकेत जोशी (ETV BHARAT Reporter)

मनसे महायुतीबरोबर? : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला. दोनच महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देत लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलत स्वबळाचा नारा दिला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या या आवाहनानंतर महायुतीची घटक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत आधी मजबुतीने उतरण्यासाठी मनसे बरोबर असावी असं महायुतीच्या काही नेत्यांची इच्छा आहे. शिवसेना नेते दीपक केसरकर त्या पाठोपाठ भाजपाचे नेते नारायण राणे यांनीसुद्धा मनसे आपल्यासोबत राहील याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मनसेसाठी जागा सोडण्याची तयारी : या संदर्भात बोलताना शिवसेना सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे म्हणाले की, "महायुतीने नेहमीच बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिला आहे. आम्हाला अधिकाधिक ताकद एकत्र करायची आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत महायुतीबरोबर होती आणि आगामी विधानसभा निवडणुकीतसुद्धा राहील, यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते निश्चित प्रयत्न करतील. मनसेला बरोबर घेतल्याने काही जागा त्यांना सोडाव्या लागतील. मात्र, महायुती अधिक बळकट करायची असेल तर तेवढी तयारी करावीच लागेल."

मनसेच्या समावेशाचा निर्णय वरिष्ठ स्तरावर : "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, आता त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळं त्यांनी त्यांची भूमिका घेतली असली तरी, महायुती बरोबर मनसेने यावे यासाठी वरिष्ठ स्तरावर चर्चा होऊ शकते. त्यांना महायुतीत सामावून घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय हा तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकानंतर महायुतीच्या पायाखालची वाळू घसरली आहे. लोकांमध्ये महायुतीबद्दल असलेली नाराजी आणि रोष पाहता त्यांना अजून कोणाची तरी मदत घ्यावी असं वाटत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही बरोबर घेतल्यामुळं कदाचित मतदानाची टक्केवारी वाढेल, असा भाबडा विश्वास महायुतीला वाटतो. म्हणूनच राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर महायुतीतील नेते राज ठाकरे यांना महायुतीत सामावून घेण्यासाठी उताविळ झाले आहेत. ॲड. यशोमती ठाकूर, काँग्रेस आमदार

राज ठाकरे यांच्या स्वबळाचा फटका बसण्याची शक्यता : या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले की, "राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली असून आता त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. ते राज्यात सर्व मतदार संघाचा आढावा घेतील. राज ठाकरे यांची नाशिक, ठाणे, पुणे यासह मुंबई महानगरात बऱ्यापैकी ताकद आहे. राज ठाकरेंच्या मनसेचं मतदान आपल्या बरोबर राहावं यासाठी महायुती निश्चितच प्रयत्न करत आहे. हे मतदान जर दूर झाले तर त्याचा महायुतीला आणखी फटका बसू शकतो. यासाठी ते निश्चित प्रयत्न करत आहेत. मात्र, राज ठाकरे यांना किती जागा दिल्या जातात आणि ते कसे मान्य करतात यावर हे गणित अवलंबून असेल. तर दुसरीकडं महाविकास आघाडी मात्र राज ठाकरे यांनी महायुती बरोबर लढू नये यासाठी प्रयत्नशील असेल," असेही जोशी यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. अजित पवारांना झटका: आमदारकीची टर्म संपताच बाबाजानी दुर्राणी यांची 'घरवापसी' - Babajani Durrani
  2. ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमकपणा रोखण्यासाठी 'मोठ्या भावाची' टीम तयार; कोण वरचढ? - Congress Coordination Committee
  3. "विधानसभा निवडणुकीपूर्वी अपात्रतेचा निर्णय झाला नाही तर..."; शिवसेनेकडून न्यायालयात याचिका - MLA Disqualification Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.