ETV Bharat / politics

एकहाती झेंडा रोवणारा मतदारसंघ राखण्याचं भाजपापुढं कडवं आव्हान - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपा, कॉँग्रेस आणि अपक्ष उमेदवार आलीमचंदानी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
वंचित बहुजन आघाडी (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2024, 5:53 PM IST

Updated : Nov 11, 2024, 7:08 PM IST

अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला त्यांनी उभा केलेल्या उमेदवारानं धोखा दिल्यानंतर या मतदारसंघात वंचितकडे उमेदवारच नव्हता. त्यामुळं आता वंचित कोणाला पाठींबा देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतू, वंचितनं आज (11 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवार हरिष आलीमचंदानी यांना पाठींबा देणार असल्याचं जाहीर केलं. वंचितच्या पाठींब्यामुळं अपक्ष आलीमचंदानी यांची ताकद वाढली असली तरी भाजपाला मात्र टेंशन आलं आहे. कारण या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराला पक्षातूनच विरोध आहे, तसंच नागरिकांमध्येही रोष आहे. त्यामुळं गेल्या 6 निवडणुकांमध्ये एकहाती झेंडा रोवणारा मतदारसंघ भाजपा गमावत असल्याचं दिसत आहे.

वंचितचा बालेकिल्ला : अकोला जिल्हा हा वंचितचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपले पाचही उमेदवार मतदार संघात उभे करीत असते. बाळापूर आणि अकोला पूर्व मतदारसंघात वंचितांचे उमेदवार निवडूनही आले आहेत. मात्र, 2014 पासून वंचितला एकही मतदारसंघ मिळविता आला नाही. यावेळी मात्र, वंचितनं चांगली खेळी करून उमेदवार उभे केले होते. अकोला पश्चिममध्ये वंचितला चांगला उमेदवार मिळत नव्हता. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारी मागणारे माजी आमदार अजहर हुसेन यांचे पुत्र झिशान हुसैन यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी वंचितमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली.

वंचित बहुजन आघाडीनं पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली भूमिका (Source - ETV Bharat Reporter)

वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी : वंचितनं अकोला पश्चिममध्ये झिशान हुसेन यांना उमेदवारी दिल्यानं चांगला उमेदवार मिळाला, असं म्हटलं होतं. परंतु, उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी झिशान हुसैन यांनी वंचितकडून आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळं वंचितसाठी हा मोठा धक्का मानला जात होता. परिणामी, अकोला जिल्यात वंचितची राजकीय नाचक्की झाली होती. त्यासोबतच झिशान हुसैन यांच्याविरोधात ही वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.

भाजपासमोर कडवं आवाहन : दुसरीकडे, भाजपाला भाजपमधूनच कडवं आवाहन मिळालं आहे. भाजपानं अकोला पश्चिममधून विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होत असताना भाजपाचे माजी नगरसेवक हरिष आलीमचंदानी यांनी अपक्ष आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारी सदस्य अशोक ओळंबे यांनी प्रहार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपालाच कडवं आवाहन दिलं आहे. त्यात आज वंचितनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळं हरिष आलीमचंदानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तिरंगी लढत : वंचित बहुजन आघाडीनं सावध भूमिका घेत अपक्ष उमेदवार हरिष आलीमचंदानी यांना पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळं हरिष आलीमचंदानी हे आता विजयाच्या रेसमध्ये आले आहे. भाजपामधील मतदारांच्या फुटीमुळं कॉँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण हे निवडून येण्याची दाट शक्यता होती. मात्र, आता हरिष आलीमचंदानी यांना वंचितनं पाठींबा दिल्यानं या मतदार संघात भाजपा, कॉँग्रेस आणि अपक्ष उमेदवार आलीमचंदानी यांच्यामध्ये विजयासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. परिणामी, या निवडणुकीत आता कोणाचा विजय होतो? किंबहुना भाजपाचे मतदार हरिष आलीमचंदानीला मतदान करतील का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

  1. भाजपाला जनतेने सत्ता दिली, मात्र त्यांनी काळा अध्याय लिहिला; अशोक गेहलोत यांची टीका
  2. मराठा आरक्षणासाठी चारच पर्याय; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मराठा महासंघाची भूमिका स्पष्ट, म्हणाले...
  3. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील तिन्ही राखीव मतदारसंघात बंडखोरांमुळं महायुतीला फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Last Updated : Nov 11, 2024, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.