ETV Bharat / politics

"एससी-एसटी आणि ओबीसींची प्रगती..."; नाशिकच्या सभेतून पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीला घेरलं - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024

महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये सभा घेतली. "महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे," असं ते म्हणाले.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2024, 3:47 PM IST

Updated : Nov 8, 2024, 4:14 PM IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये सभा घेत कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "महाराष्ट्रात उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 5 लाखांहून अधिक महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आलं. जल जीवन अभियानांतर्गत राज्यातील 1.25 कोटींहून अधिक कुटुंबांना नळाच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 7 कोटी गरीब लोकांना दर महिन्याला मोफत रेशन मिळत आहे, 26 लाखांहून अधिक लोकांना पीएम आवास योजनेचा फायदा झाला आहे, त्यांना स्वतःचं घर सरकारकडून देण्यात आलं, त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे."

लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा फायदा : "डबल इंजिनच्या सरकारमध्ये विकासाचा वेग दुप्पट होतो. त्यासोबतच योजनांचा लाभही दुप्पट होतो. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येथील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. राज्यात पुन्हा आमचं सरकार आल्यावर ही 12,000 रुपयांची मदत वाढवून 15,000 रुपये केली जाईल, ज्यामुळं लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा फायदा होईल,"असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसला त्यांची जागा दाखवावी : "जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर भाजपाच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं कलम 370 हटवून भारताचं संविधान लागू केलं. तेथील दलित, वंचितांम त्यांचा हक्क मिळवून दिला. मात्र विधानसभेत सत्ता येताच काँग्रेस व त्यांच्या बगलबच्यांनी पुन्हा तेथे कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे. काश्मीरमध्ये संविधानाला पायदळी तुडवायचं आणि इकडे महाराष्ट्रात येवून संविधानाचा जप करीत लोकांमध्ये धूळफेक करायची, अशी दुहेरी निती काँग्रेसवाल्यांनी चालविली आहे. महाविकास आघाडीवाले देशाला मागे खेचण्याचं काम करतायत. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. एससी-एसटी आणि ओबीसींची प्रगती होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. काँग्रेसच्या या धुळफेकीला वेळीच ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवावी," असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत बोलताना केलं.

सभेतील ठळक मुद्दे :

-पंतप्रधान मोदींचा 'जय भवानी जय शिवाजी'चा नारा.

-प्रभू राम पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीला माझा नमस्कार.

-मी अनुष्ठानची सुरुवात काळाराम मंदिरमधून केली, तिथे सेवा पण केली.

-विकसित भारतसाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.

-भाजपा, महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.

-पु ल देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

-गरीबाची चिंता करणारं सरकार आहे देशात

-काँग्रेसने फक्त 'गरिबी हटावो'चा नारा दिला

-25 करोड लोक गरिबीमधून बाहेर आले.

-मोदी गरिबांचा सेवक म्हणून काम करत आहे.

-महाराष्ट्रमध्ये 50 लाख महिलांना गॅस योजना, शेती योजना, शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार मदत वाढवून ती 15 हजार करणार.

-डबल इंजिन सरकारमध्ये विकास गती वाढणार.

-कांदा निर्यात सवलत दिली

-महाराष्ट्र पुढे जाईल तर देश पुढे जाईल

-महाराष्ट्र प्रगती करत आहे.

-कॉग्रेस चांगल्या कामाचा विरोध करत आहे. अटल सेतू, मेट्रो, समृद्धीचे काम थांबवण्याचे काम काँग्रेसने केले

-आघाडी सरकार लांब ठेवा

-नाशिक प्रगती करत आहे. चागले रस्ते होत आहेत. आयटी पार्क होत आहे. कुंभमेळामध्ये याचा फायदा होत आहे

-लढाऊ विमान नाशिकमध्ये तयार होत आहेत

-कॉग्रेसवाले 'खाली पन्ने वाली 'किताब लेकरं घुमते हे'

-काँग्रेस बाबासाहेबांचं संविधान हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

-भाजपाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसनं 'झूठ की दुकान' सुरू केली आहे.

-काही काँग्रेस राज्यात सरकार चालवण्यासाठी त्यांच्याकडं पैसे नाही. लोकांकडून टॅक्स लावून पैसे गोळा करत आहे.

-काँग्रेस एसी, एसटी, ओबीसी समाजची एकता तोडू पाहत आहे.

-सत्तेसाठी काँग्रेस ओबीसीमध्ये वाद लावत आहे.

-हम एक हे तो सेफ हे

-आज एक ओबीसी सर्वांच्या आशीर्वादाने देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला आहे.

-त्यामुळे काँग्रेसला झोप लागत नाही.

-लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात गेली

-3 करोड महिलांना लखपती बनवत आहे.

हेही वाचा -

  1. 'एक है तो सेफ है'; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातून नवा नारा, महाविकास आघाडीवर हल्लाबोल
  2. अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरवर ३ वर्षांची बंदी, बोगस कागदपत्रं दिल्यामुळं कंपनीवर मोठी कारवाई
  3. अजित पवारांच्या फायलीवर देवेंद्र फडणवीसांनीच चौकशी लावली, सुप्रिया सुळेंचा भाजपावर पलटवार

Last Updated : Nov 8, 2024, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.