मुंबई : मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना देखील उमेदवारी जाहीर झालीय. तर संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळं आता वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे यांच्यात सामना रंगणार आहे.
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी : विधानसभेसाठी मनसेनं यादी जाहीर केली आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याची उत्सुकता सर्वांना होती, ती आता खरी ठरली असून, अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. या यादीत मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. अमित ठाकरे यांनी माहीम मतदरसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता.
मनसेच्या यादीत कोणाला संधी?
कल्याण ग्रामीण - राजू पाटील
माहिम - अमित राज ठाकरे
भांडूप पश्चिम - शिरीष सावंत
वरळी - संदीप देशपांडे
ठाणे शहर - अविनाश जाधव
मुरबाड - संगीता चेंदवणकर
कोथरुड - किशोर शिंदे
हडपसर - साईनाथ बाबर
खडकवासला - मयुरेश रमेश वांजळे
मागाठाणे -नयन कदम
बोरीवली - कुणाल माईणकर
दहिसर - राजेश येरुणकर
दिंडोशी - भास्कर परब
वर्सोवा - संदेश देसाई
कांदिवली पूर्व - महेश फरकासे
गोरेगाव - विरेंद्र जाधव
चारकोप - दिनेश साळवी
जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे
विक्रोळी - विश्वजित ढोलम
घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे
चेंबूर - माऊली थोरवे
चांदिवली - महेंद्र भानुशाली
मानखुर्द शिवाजीनगर - जगदीश खांडेकर
ऐरोली - निलेश बाणखेले
बेलापूर - गजानन काळे
मुंब्रा कळवा - सुशांत सूर्यराव
नालासोपारा - विनोद मोरे
भिवंडी पश्चिम - मनोज गुळवी
मीरा भाईंदर - संदीप राणे
शहापूर - हरिश्चंद्र खांडवी
गुहागर - प्रमोद गांधी
कर्जत जामखेड - रविंद्र कोठारी
आष्टी - कैलास दरेकर
गेवराई - मयुरी बाळासाहेब म्हस्के
औसा - शिवकुमार नागराळे
जळगाव शहर - अनुज पाटील
वरोरा - प्रवीण सूर
सोलापूर दक्षिण - महादेव कोनगुरे
कागल - रोहन निर्मळ
तासगाव कवठे महांकाळ - वैभव कुलकर्णी
श्रीगोंदा - संजय शेळके
हिंगणा - विजयराम किनकर
नागपूर दक्षिण - आदित्य दुरुगकर
सोलापूर शहर उत्तर - परशुराम इंगळे
आधीच 9 उमेदवार केले होते जाहीर : विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केला होता. त्यामुळं त्यांनी यापूर्वीच मनसेच्या 9 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे व कल्याणमधून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. तर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यात 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. आता 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
मनसेचे आमदार वाढणार? : मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आपल्या सभांमधील भाषणांमध्ये या विधानसभा निवडणुकीनंतर मनसे हा सत्तेमधील पक्ष असेल, असा सातत्यानं दावा करत आहेत. आतापर्यंत ज्या पक्षाला केवळ एका आमदाराचा पक्ष म्हटलं जात होतं, त्यांचे आमदार या विधानसभा निवडणुकीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे अमित ठाकरे यांच्या रूपानं दुसऱ्या ठाकरेंनी देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला आहे.
हेही वाचा -