ETV Bharat / politics

बंडखोरीमुळं भाजपाची वाढली डोकेदुखी; अकोला पश्चिममध्ये बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यानं पक्षाशी बंडखोरी केलेल्या दोन उमेदवारांना शांत करण्याचे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न फोल ठरल्याचं पाहायला मिळत आहे.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
अशोक ओळंबे, हरिष आलिमचंदानी (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2024, 4:10 PM IST

अकोला : विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून संधी मिळण्याची आशा संपुष्टात आल्यानंतर पक्षाशी बंडखोरी केलेल्या दोन उमेदवारांना शांत करण्याचे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे. एक बंडखोर उमेदवार प्रहार जनशक्ती पक्षातून तर दुसरा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उभा आहे. तरीही पक्षाकडून या दोघांची मनधरणी सुरू असल्याचं बोललं जात आहे.

भाजपा गड राखणार की बदल घडणार? : भाजपानं तिकीट नाकारल्यानं अशोक ओळंबे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जुने शहर परिसरात विशेषतः डाबकी रोड परिसरात त्यांची चांगली पकड आहे. तर दुसरीकडे सिंधी समाजाचे नेते हरिष आलिमचंदानी यांनाही पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पक्षाशी बंडखोरी करणं हा पर्याय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं आता त्यांचं आवाहन थेट भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांनाच असल्यानं भाजपाला आता अकोला पश्चिम गड राखता येतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

नगरसेवकांमध्येही नाराजी : महानगरपालिकेमध्ये महापौर असताना आणि शहर अध्यक्ष असताना विजय अग्रवाल यांनी पक्षातील नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही. त्यांच्या हेकेखोरपणामुळं नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी होती. पक्षानं विजय अग्रवाल यांना उमेदवारी देऊ नये, असं मत असतानाही पक्षानं त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळं त्यांच्याविरोधात नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोला दौऱ्यावर? : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 नोव्हेंबर नंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 ला मतमोजणी होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराची जोरात तयारी करण्यात येत आहे. भाजपाकडून प्रचाराच्या पहिल्याच आठवड्यात मोठी प्रचारसभाच घेण्यात येत आहे. या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकोल्यात 9 नोव्हेंबरला येत असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथे सभा घेतली होती. त्यांच्या उपस्थितीमुळं मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या सभांना हजर होते. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यातील भाजपा किंवा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात सभा घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांची सभा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात भाजपाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये.

हेही वाचा

  1. "महिलांना दरमहा 2100 रुपये, तर दोन मोफत गॅस सिलेंडर...", झारखंड निवडणुकीसाठी भाजपाचं 'संकल्प पत्र' जारी
  2. "राज ठाकरेंना भेटून त्यांचा आशीर्वाद...", नेमकं काय म्हणाले सदा सरवणकर? माहीमचा पेच सुटणार?
  3. राज ठाकरेंचा 'विश्वजित' संजय राऊत बंधूंचा गड भेदण्याच्या तयारीत; विक्रोळीत कोणाचा होणार विजय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.