मुंबई : रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून मुंबईत धारावी आणि कालिना हे दोन मतदार संघ देण्यात आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी (28 पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पक्षातील कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभागी करुन घेतलं जाणार असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आठवलेंनी दिली. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन आठवले यांनी कार्यकर्त्यांना केलंय.
सत्ता आल्यानंतर पुरेसा सन्मान व हिस्सा देण्याची ग्वाही : आठवलेंनी मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली यावेळी ते बोलत होते. महायुतीची सत्ता आल्यानंतर विधानपरिषद सदस्यत्व, राज्यात एक कॅबिनेट मंत्री पद, सत्तेमध्ये पुरेसा सन्मान व हिस्सा देण्याची ग्वाही मिळाल्यानं आठवलेंनी महायुतीच्या प्रचारात सहभागी होण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे उपस्थित होते. शिवसेनेच्या कोट्यातून धारावी मतदारसंघ व भाजपाच्या कोट्यातून कलिना मतदारसंघ पक्षाला देण्यात आल्याची माहिती आठवलेंनी यावेळी दिली.
अनीस अहमद यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश : नागपूर मध्य मधून लढणारे कॉंग्रेसचे माजी मंत्री अनीस अहमद यांनी सोमवारी वंचित बहुजन महासंघात प्रवेश केला. नागपूर मध्य मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. नागपूर मध्य मतदारसंघातून अनीस अहमद तीन वेळा आमदार राहिले आहेत. विदर्भात कॉंग्रेसनं तिकीट विकल्याचा आरोप अहमद यांनी केलाय.
हेही वाचा