ETV Bharat / politics

"राहुल गांधी म्हणजे खोटं बोलणारी फॅक्टरी, तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये", अमित शाहांचा हल्लाबोल - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

साताऱ्यातील कराड दक्षिणचे महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शुक्रवारी जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
अमित शाह, राहुल गांधी (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2024, 4:46 PM IST

Updated : Nov 8, 2024, 5:33 PM IST

सातारा : कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगाणाच्या निवडणुकीत काँग्रेसनं आश्वासनांचे पेटारे उघडले आणि निवडणुका जिंकल्या. परंतु, आश्वासनं पाळली नाहीत. आता सांभाळून आश्वासनं द्या, असं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पार्टीचा अध्यक्ष असं म्हणत असेल तर ती पार्टी आश्वासनं पाळू शकते का? असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी ही खोटं बोलणारी फॅक्टरी आहे. तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

प्रत्येक अग्निवीराला पेन्शनची नोकरी देणार : कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचार सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, "अग्निवीर ही तरूणांना बेकार करणारी नाही तर सैन्य दलाला तरूण करणारी योजना आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक अग्निवीराला परत आल्यानंतर केंद्र सरकार सीएपीएफ आणि महाराष्ट्र सरकार पेन्शनची नोकरी देईल. हे भाजपाचं आश्वासन आहे आणि मोदींची आश्वासनं फसवी नसतात. मोदी बोलतात ते करतात."

अमित शाहांची विरोधकांवर टीका (Source - ETV Bharat Reporter)

काँग्रेसचं आश्वासन मोदींनी पूर्ण केलं : 'दिवंगत इंदिरा गांधींनी 'वन रॅंक, वन पेन्शन' योजनेचं आश्वासन दिलं होतं. परंतु, चाळीस वर्षात काँग्रेसनं ते आश्वासन पाळलं नाही. शेवटी नरेंद्र मोदींनी त्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी केली. आमच्या आश्वासनांना काँग्रेसनं 'चुनावी जुमला' म्हटलं. परंतु, मोदींनी ती आश्वासनं पूर्ण करून दाखवली. 'वन रॅंक, वन पेन्शन' योजनेतून १ लाख ५५ हजार कोटी रूपये जवानांच्या कुटुंबांना दिले. आमची आश्वासनं तुमच्या खटाखट, फटाफट सारखी नसतात," असा टोलाही शाहांनी काँग्रेसला लगावला.

राम मंदिराचा विषय काँग्रेसनं लटकवत ठेवला : अयोध्येतील राम मंदिराचा विषय काँग्रेसनं ७५ वर्षे लटकवत, भटकवत ठेवल्याचा घणाघाती आरोप अमित शाहांनी केला. "नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अयोध्यामध्ये मंदिराचं भूमीपूजन करून थांबलो नाही, तर मंदिर बांधून दाखवलं. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर सर्व विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आणला असला तरी राहुल गांधींची चौथी पिढीसुध्दा ३७० कलम पुन्हा लागू करू शकणार नाही," असा सज्जड इशाराच शाहांनी दिला.

मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार : "जम्मू-काश्मिरमधील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा पुरावा मागणाऱ्यांनी टीव्हीवर पाकिस्तानी नेत्यांची पडलेली तोंड पाहिली असती तरी पुरावे मिळाले असते," असा उपरोधिक टोला अमित शाहांनी राहुल गांधींना लगावला. "तसंच मागील निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला बहुमत मिळालं होतं. परंतु, शिवसेनेनं जनादेशाला धोका दिला. हिंदुत्ववाद्यांना पाखंडी म्हणणाऱ्या, श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार जाऊन बसले," अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली.

शरद पवारांवर सडकून टीका : "शरद पवार या वयात देखील खोटं बोलतात. राज्यात गुंतवणूक आली नसल्याचे ते सांगत आहेत. वास्तविक देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली असल्याचं अमित शाहांनी ठणकावून सांगितलं. महायुतीच्या काळात समृध्दी महामार्ग, मेट्रो, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, महिला, शेतकरी, तरूणांसाठी योजना राबवल्या. त्यासारखं महाविकास आघाडीच्या काळातील एखादं काम शरद पवारांनी सांगावं," असं आव्हानही शाहांनी दिलं. युपीए काळात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण केंद्रात मंत्री असतानाही महाराष्ट्रावर त्यांनी अन्यायच केल्याचा आरोपही शाहांनी केला.

हेही वाचा

  1. "मला पाडायचं होतं म्हणून त्यावेळी पंतप्रधान मोदींनी बारामतीत सभा घेतली अन् आता..."; अजित पवार स्पष्टच बोलले
  2. राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; तर शरद पवारांची अजित पवार आणि भाजपाशी लढत रंगणार
  3. "एससी-एसटी आणि ओबीसींची प्रगती..."; नाशिकच्या सभेतून पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीला घेरलं

Last Updated : Nov 8, 2024, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.