ETV Bharat / politics

Lok Sabha Elections 2024: कोणता झेंडा घेवू हाती? राज ठाकरे-अमित शाह भेटीनंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसैनिक संभ्रमात - bhiwandi loksabha constituency

Lok Sabha Elections 2024 : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मनसेनं भिवंडी लोकसभा मतदारसंघात लाखाच्या जवळ मतं घेतली होती. मात्र, यावेळी मनसेची भूमिका स्पष्ट न झाल्यानं कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात असल्याचं चित्र आहे.

Lok Sabha Elections 2024: भिवंडी मतदारसंघात मागील दोन लोकसभेत लाखाच्याजवळं मतं घेणाऱ्या मनेसेचे कार्यकर्ते संभ्रमात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 7:51 AM IST

ठाणे Lok Sabha Elections 2024 : एकीकडे लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु असतानाच राजकीय समीकरणे रोजच बदलत आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अद्यापही भिवंडी लोकसभेच्या उमेदवाराबाबत संभ्रमात आहे. अशातच मनसेचा तिढा कायम असल्यानं महाविकास आघाडी राजकीय पेचात सापडली आहे. आघाडीची डोकेदुखी वाढली असतानाच राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत जाऊन भेट घेतली. मात्र या दोघांमध्ये झालेली संपूर्ण चर्चाही गुलदस्त्यातच आहे. दिल्ली भेटीनंतर नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीवरही आतापर्यंत तरी प्रश्नचिन्हच दिसून येत आहे.

मागील दोन लोकसभेत लाखाच्याजवळ मतं : मागील लोकसभा निवडणुक 2009 मध्ये भिवंडी मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे यांनी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्या विरोधात निवडणूक लढवताना 1 लाखांहून अधिक मते मिळवली होती. तर 2014 मध्ये मनसेमध्ये असताना सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात 96 हजार मतं मिळवली होती. त्यामुळं मनसेची भिवंडी लोकसभा क्षेत्रातील ताकद पाहता मनसे आघाडीत की महायुतीत सामील होते का? याबाबत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था असल्याचं स्पष्टपणे उघड होतंय.

कार्यकर्ते संभ्रमात : मनसेचा राजकीय इतिहास पाहता मनसेच्या पक्ष स्थापनेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत मनसेचे राज्यात 13 आमदार विजयी झाले होते. यात भिवंडी लोकसभा मतदार संघात 2009 च्या निवडणुकीत प्रकाश भोईर हे कल्याण पश्चिममधून आमदार म्हणून निवडून आले होते. यासह शहापूर, कल्याण, भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये मनसेनं बऱ्यापैकी हातपाय पसरवले होते. तर भिवंडी, शहापूर, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ग्रामपंचायतींमध्येदेखील मनसेचे सदस्य होते. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येवून कोणता नेता कुठल्या पक्षाची वाट धरेल या भीतीनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी चिंतेत आहेत. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणूकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणत्या पक्षाची वाट धरतील हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पक्षश्रेष्ठांकडून कोणतेही आदेश नाही : विशेष म्हणजे राज ठाकरेंनी भाषणातून म्हटलेल्या 'लावरे तो व्हिडीओ' चे आता 'बघ रे तो व्हिडीओ' चे मीम सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किंवा गटाला पाठिंबा द्यायचा याबाबत आदेश पारित न झाल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे. याबाबत लवकरच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

अद्याप मनसेच्या उमेदवाराच्या नावाची चर्चाही नाही : केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांना लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपाची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झालीय. तर महाविकास आघाडी उमेदवारीकरिता राष्ट्रवादी शरद पवार गटातील सुरेश म्हात्रे उर्फ (बाळ्या मामा) जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे तर काँग्रेसकडून दयानंद चोरघे आणि उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु सन 2009 आणि 2014 साली लोकसभा निवडणूक लढवून लाखभर मतं मिळविणाऱ्या मनसेच्या उमेदवाराचं नाव चर्चेतही नसल्यानं भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

हेही वाचा :

  1. आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीतून माघार, राज ठाकरेंच्या 'मनसे'ला अधिक महत्त्व
  2. Ajit Pawar : पार्थ पवार गनिमी काव्यानं प्रचार करतात...; अजित पवारांची मिस्कील प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.