ETV Bharat / politics

पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ विजयी; विजयानंतर दिली पहिली प्रतिक्रिया - Pune Loksabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 8:36 PM IST

Pune Loksabha Election 2024 : राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या पुणे लोकसभा निवडणुकीत पुणेकरांनी विकासाला कौल दिलाय. पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना पुणेकरांनी पसंती दिली आहे.

Pune Loksabha Election 2024
मुरलीधर मोहोळ विजयी (Etv Bharat MH DESK)

पुणे Pune Loksabha Election 2024 : पुणे लोकसभा मतदार संघात यंदा तिरंगी लढत होती. भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीपूर्वी मनसेत असणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत वंचितकडून निवडणूक लढवली होती.

प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ (ETV Bharat Reporter)

मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर : राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष पुणे लोकसभा मतदारसंघाकडं लागलं होतं. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अशी लढत पाहायला मिळाली. आज झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले झाले असून तब्बल 1 लाखांहून अधिक मतांनी ते विजयी झाले आहेत.

Pune Loksabha Election 2024
मुरलीधर मोहोळ विजयी (ETV Bharat Reporter)

पुणेकरांनी विकासाला साथ दिली : पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरी पर्यंत मोहोळ हे आघाडी होते. मोहोळ हे विजयी झाल्यावर कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला आहे. यावेळी मोहोळ यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांचा असून पुणेकरांनी विकासाच्या मुद्द्याला साथ दिल्याचं म्हटलं. या निवडणुकीत खालच्या पातळीवर टीका झाली पण पुणेकर नागरिकांनी विकासाच्या मुद्द्याला साथ दिली असल्याचं यावेळी मोहोळ म्हणाले.

पुणे लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

वर्ष - 2019 गिरीश बापट (विजयी उमेदवार- भाजप) 61.13% मतं

वर्ष - 2014 अनिल शिरोळे (विजयी उमेदवार- भाजप) 57.37% मतं

वर्ष - 2009 सुरेश कलमाडी (विजयी उमेदवार- काँग्रेस ) 38.11% मतं

वर्ष - 2004 सुरेश कलमाडी (विजयी उमेदवार- काँग्रेस ) 48.06% मतं

वर्ष - 1999 प्रदीप रावत (विजयी उमेदवार- भाजप) 41.62% मतं

हेही वाचा -

  1. अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक, दक्षिण मुंबईतून दणदणीत विजय, यामिनी जाधव यांचा तब्बल 54 हजार मतांनी पराभव - South Mumbai Lok sabha Election results
  2. रावेर लोकसभा निकाल 2024 : रक्षा खडसे की श्रीराम पाटील? कोण मारणार बाजी? - Raver Lok Sabha Election Results
  3. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, बाळ्या मामांना निर्णयाक आघाडी; विजयाची औपचारिक घोषणा बाकी - Maharashtra lok Sabha election

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.