ETV Bharat / politics

राज्यात 'या' मतदारसंघात महाविकास आघाडीचा जोर; काय सांगतो अंदाज? पाहा स्पेशल रिपोर्ट - Lok Sabha Election Results 2024

Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील मागील दोन महिन्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार यांना भेटलेल्या सहानुभूतीच्या लाटेनं राज्यात कुठल्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच पारडं जड मानलं जातंय.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 8:16 PM IST

मुंबई Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी देशभरात जाहीर होणार असून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यात मागील दोन वर्षात बदललेली राजकीय समीकरणं पाहता यंदा महाविकास आघाडी की महायुती कोणाच्या बाजूनं जनतेनं कौल दिला ते स्पष्ट होणार आहे. अशात उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेनं राज्यात कुठल्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच पारडं जड मानलं जातंय याचा घेतलेला एक धावता आढावा.

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची ताकद : पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 12 जागा आहेत. यात कोल्हापुरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विजयासाठी महाविकास आघाडीनं पूर्ण ताकद पणाला लावली होती. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव इथं निश्चित मानला जातोय. तर सोलापुरमध्ये काँग्रेसच्याच प्रणिती शिंदे या भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव करतील असा अंदाज आहे. पुण्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धनगर हे भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा पराभव करतील अशीही दाट शक्यता असल्यानं पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस 3 जागा जिंकेल असा अनुमान आहे. तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या त्यांच्या भावजय अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा निसटत्या मतानं पराभव करतील. शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करण्याची शक्यता आहे. तर अहमदनगरमध्ये भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांचा विजय निश्चित मानला जात असून साताऱ्यात भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा विजय निश्चित मानला जातो. अशाप्रकारे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाच्या 4 जागा निवडून येतील असा अंदाज आहे. तर शिर्डीत शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात रंगतदार सामना झाला असून यामध्ये वाकचौरे बाजी मारतील अशी अपेक्षा आहे.

विदर्भात मुनगंटीवारांना धक्का? : विदर्भात लोकसभेच्या एकूण 10 जागा असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमरावती मतदारसंघात भाजपाच्या नवनीत राणा यांचा काँग्रेसचे बळवंत वानखडे मोठ्या मतांनी पराभव करतील असा अंदाज असून चंद्रपुरमध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा सामना काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्याशी झाला असून इथं प्रतिभा धानोरकर यांचं पारडं जड मानलं जातय. तर यवतमाळ-वाशिम मध्ये शिवसेना शिंदे गटानं राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली व त्यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्याशी झाला असून संजय देशमुख विजयी होतील अशी खात्री आहे.

मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांचा जोर? : मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण 8 जागांपैकी औरंगाबादमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांच्याशी झाला असून इथं चंद्रकांत खैरे विजयी होतील. तर उस्मानाबादमध्ये उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांची लढत अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याशी झाली असून इथं ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाची पूर्ण खात्री आहे. परभणीमध्ये रासपचे महादेव जानकर यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्याशी झाला असून इथंही महादेव जानकर यांचा निसटत्या मतांनी पराभव होईल अशी शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात भारती पवार, हेमंत गोडसे, सुभाष भामरे यांच्यासाठी धोक्याची घंटा : उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 6 जागा असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या भारती पवार यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांच्याशी झाला असून या अटीतटीच्या लढतीत भास्करराव भगरे यांचा विजय निश्चित मानला जातोय. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्याशी झाला असून इथं वाजे यांचे पारडं जड मानलं जातंय. तर धुळे मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांची लढत काँग्रेसच्या डॉ शोभा बच्छाव यांच्याशी झाला असून येथून शोभा बच्छाव या विजयी होतील अशी अपेक्षा आहे.

कोकणात भाजपला धक्का : कोकणातील एकूण ६ जागांमध्ये रत्नागिरी- सिंधुदुर्ग या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार, विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी झाला असून या अटीतटीच्या लढतीमध्ये विनायक राऊत यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा सामना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांच्याशी झाला असून राजन विचारे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी शक्यता आहे. तर भिवंडी मध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळ्या मामा म्हात्रे यांच्याशी झाला असून येथून बाळ्या मामा म्हात्रे यांच्या विजयाची अपेक्षा आहे.

मुंबईत महाविकास आघाडीला 4 जागा : मुंबईतील एकूण 6 जागांपैकी दक्षिण मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासमोर शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचं आव्हान असून इथून अरविंद सावंत यांचा विजय निश्चित मानला जातोय. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी झाला असून या मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांचा विजय नक्की मानला जातोय. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाचे उमेदवार जेष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची लढत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांसोबत झाली असून या अटीतटीच्या लढतीत वर्षा गायकवाड यांचं पारडं जड मानलं जातंय. उत्तर पूर्व मुंबईमध्ये सुद्धा भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्याशी झाला असून या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांचा विजय निश्चित मानला जातोय.

हेही वाचा :

  1. निवडणूक निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा झटका; कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश - Uddhav Thackeray
  2. विधानसभा निवडणूक 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात विखे विरुद्ध कोल्हे संघर्ष होणार? - Nashik Teachers Constituency

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.