ETV Bharat / politics

देशातील सर्वात तरुण खासदार असलेल्या शांभवी चौधरी कोण आहेत? काँग्रेसच्या उमेदवाराचा केला पराभव - Shambhavi Choudhary - SHAMBHAVI CHOUDHARY

Shambhavi Choudhary : लोक जनशक्ती पक्षाच्या शांभवी चौधरी यांनी काँग्रेस उमेदवार सनी हजारी यांचा 1 लाख 87 हजार 251 मतांनी पराभव केलाय. त्या देशातील सर्वात तरुण खासदार आहेत.

Shambhavi Choudhary
Shambhavi Choudhary (Source- Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 8:56 AM IST

Lok Sabha Election 2024 : समस्तीपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून लोक जनशक्ती पक्षाच्या उमेदवार शांभवी चौधरी विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत शांभवी चौधरी या देशातील सर्वात तरुण खासदार ठरल्या आहेत. त्यांचे वय 25 वर्षे आहे. त्यांनी काँग्रेसचे सनी हजारी यांचा मोठ्या फरकानं पराभव केलाय. शांभवी चौधरी 1 लाख 87 हजार 537 मतांनी विजयी झाल्या.

शांभवी यांनी आपल्या विजयाबद्दल समस्तीपूरच्या जनतेचे आभार मानलेत. "जनतेनं योग्य तो निर्णय घेतलाय. त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू", असं शांभवी चौधरी यांनी सांगितलं.

25 वर्षीय शांभवी चौधरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या की, "निवडणूक लढवण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. आमची पार्श्वभूमी राजकीय कुटुंबाशी जोडलेली आहे. माझे आजोबा मोठे नेते होते. वडीलही राजकारणात आहेत. लहानपणापासून मी आजोबा आणि वडिलांना जनतेची सेवा करताना पाहिलंय. जनतेची सेवा करायची, असं मला लहानपणापासूनच वाटायचं. मला सुरुवातीपासूनच राजकारणात रस होता. पण इतक्या लहान वयात संधी मिळेल असं वाटलं नव्हतं."

शांभवी चौधरी कोण आहेत?: शांभवी चौधरी या माजी आयपीएस अधिकारी आचार्य किशोर कुणाल यांची सून आहेत. जेडीयूचे मंत्री अशोक कुमार चौधरी हे त्यांचे वडील आहेत. शांभवी यांना समस्तीपूर राखीव जागेवरून एलजेपीआरची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं. एमिटी विद्यापीठातून समाजशास्त्रात पीएचडी मिळवली. सध्या त्या पाटणा येथील ज्ञान निकेतन शाळेत संचालक म्हणून कार्यरत आहेत.

  • चंद्राणी मुर्मू या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात तरुण खासदार होत्या. चंद्रानी यांनी ओडिशातील केओंझार (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. बीजेडीचे उमेदवार म्हणून त्या विजयी झाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत विजय मिळविताना चंद्राणी मुर्मू यांचे 25 वर्षे 11 महिने वय होते. लोकसभेत खासदार होण्याकरिता 25 वर्ष पूर्ण करण्याची अट आहे.

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.