ETV Bharat / politics

सत्तेसाठी भाजपा कोणतीही किंमत मोजण्यास तयार - सोनिया गांधी यांचा घणाघात - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 6:56 AM IST

Updated : May 7, 2024, 5:02 PM IST

17:01 May 07

सत्तेसाठी भाजपा कोणतीही किंमत मोजण्यास तयार - सोनिया गांधी यांचा घणाघात

नवी दिल्ली - काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी भाजपा तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी व्हिडिओ संदेशात म्हटलंय, "आज देशाच्या कानाकोपऱ्यात तरुण बेरोजगारीला सामोरे जात आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना भयंकर भेदभावाचा सामना करावा लागत आहे. हे वातावरण पंतप्रधानांच्या हेतूमुळे आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपाला कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी समर्पित आहे आणि सर्वांच्या चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसला मतं द्या आणि आपण मिळून एक मजबूत आणि अखंड भारत घडवूया..."

14:04 May 07

तिसऱ्या टप्प्यासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 39.92% मतदान

तिसऱ्या टप्प्यासाठी दुपारी 1 वाजेपर्यंतची देशभरातील आकडेवारी खालील प्रमाणे...

आसाम 45.88%

बिहार 36.69%

छत्तीसगड 46.14%

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 39.94%

गोवा 49.04%

गुजरात 37.83%

कर्नाटक 41.59%

मध्य प्रदेश 44.67%

महाराष्ट्र ३१.५५%

उत्तर प्रदेश 38.12%

पश्चिम बंगाल 49.27%

12:36 May 07

भाजपा गोव्यात दोन्ही जागा जिंकेल

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आजच्या मतदानाविषयी पत्रकारांशी संवाद साधला. कोठांबीमध्ये मतदान केल्यानंतर ते म्हणाले,"...मला माहीत आहे की लोक लोकशाहीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत... मला आशा आहे की गोव्यात यावेळी विक्रमी मतदान होईल. गोव्यातलं मतदान 75% पर्यंत असेल. लोक विकसित भारत आणि विकसित गोव्यासाठी मतदान करत आहेत... भाजपा गोव्यात दोन्ही जागा जिंकेल."

11:56 May 07

तिसऱ्या टप्प्यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41% मतदान

तिसऱ्या टप्प्यातील देशभरातील मतदानाची सकाळई ११ वाजेपर्यंतची टक्केवारी खालील प्रमाणे..

आसाम 27.34%

बिहार 24.41%

छत्तीसगड 29.90%

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 24.69%

गोवा ३०.९४%

गुजरात 24.35%

कर्नाटक 24.48%

मध्य प्रदेश 30.21%

महाराष्ट्र 18.18%

उत्तर प्रदेश 26.12%

पश्चिम बंगाल 32.82%

10:49 May 07

भाजपाचा या निवडणुकीत सडकून पराभव होणार - अखिलेश यादव

सैफई (उत्तर प्रदेश) : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज या ठिकाणी मतदान केलं. त्यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, ...भाजपचा खूप वाईट पराभव होणार आहे कारण शेतकरी, तरुण, व्यापारी, प्रत्येक वर्गातील लोक त्यांच्यावर नाराज आहेत. यादव पुढे म्हणाले की,... गरिबी महागाई, बेरोजगारी हे मुद्दे आहेत आणि आशा आहे की लोक भाजपाच्या विरोधात मतदान करतील...

10:10 May 07

यावेळी काँग्रेसचा विजय निश्चित - मल्लिकार्जुन खर्गे

कलबुर्गी (कर्नाटक) : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मतदान केलं. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सर्व व्यापारी आणि गरीब लोक मिळून काँग्रेसला यावेळी विजयी करतील. गेल्या वेळी आपल्याकडून चूक झाल्याचा लोकांना पश्चाताप होत आहे. यावेळी ते काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून देतील.

09:52 May 07

तिसऱ्या टप्प्यासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 10.57% मतदान

देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची सकाळी ९ वाजेपर्यंतची आकडेवारी खालील प्रमाणे...

आसाम 10.12%

बिहार 10.03%

छत्तीसगड 13.24%

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 10.13%

गोवा 12.35%

गुजरात 9.87%

कर्नाटक ९.४५%

मध्य प्रदेश 14.22%

09:29 May 07

अमित शाह यांनी केलं मतदान, भाजपाच्या विजयाची खात्री

अहमदाबाद - गुजरातमध्ये मतदान केल्यानंतर केंद्रीय अमित शाह म्हणाले, "उकाडा असूनही, मतदानाचा कल खूपच उत्साहवर्धक आहे. गुजरातचा विचार करता, गुजरातमधील मतदारांनी सुमारे 20 टक्के मतदान पहिल्या अडिच तासातच पूर्ण केलं आहे. ही आमच्यासाठी उत्साहवर्धक बाब आहे. यातूनच आपल्याला विजयाची खात्री वाटत असल्याचं शाह म्हणाले.

09:17 May 07

शरद पवार यांनी बजाविला मतदानाचा हक्क

राष्ट्रवादी-एससीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

09:16 May 07

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबासह केलं मतदान

बीसीसीआय सचिव जय शाह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्यांच्या पत्नी सोनल शाह यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

08:59 May 07

भाजपाचे उमेदवार शिवराज सिंह चौहान यांनी कुटुंबासह केलं मतदान

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विदिशामधील भाजपाचे उमेदवार शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या कुटुंबीयांसह सिहोर येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.

08:58 May 07

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी रांगेत राहून बजाविला मतदानाचा हक्क

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान केलं.

08:23 May 07

काँग्रेसची इच्छा असती तर ते प्रज्वल रेवण्णाला देश सोडण्यापासून रोखू शकले असते- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष

जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांचा समावेश असलेल्या अश्लील व्हिडिओ' प्रकरणावरून भाजपावर टीका होत आहे. यावर कर्नाटक भाजपाचे प्रमुख बी. वाय. विजयेंद्र यांनी म्हटलं, " आम्ही यापूर्वीच अश्लील व्हिडिओप्रकरणी आधीच निषेध केला आहे. भाजपा या प्रकारच्या वृत्तीचं कधीही समर्थन करत नाही. काँग्रेस पक्षानं इच्छा केली असती तर ते प्रज्वल रेवण्णा यांना देश सोडण्यापासून रोखू शकले असते. पण काँग्रेसनं तसे केले नाही. मात्र, काँग्रेसला त्याचे राजकारण करायचे आहे. ते खूप त्रासदायक आहे"

07:51 May 07

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजाविला मतदानाचा हक्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाण उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केलं.

07:23 May 07

मतदान केंद्रावर दिग्गज नेते पोहोचले, मतदान करण्याचं केलं आवाहन

  • गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गुजरातमधील अहमदाबाद येथील निशान उच्च माध्यमिक विद्यालयात आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच मतदान केंद्रावर येणार आहेत.
  • कर्नाटकमध्ये कलबुर्गी येथील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर भाजपाचे उमेदवार डॉ. उमेश जाधव यांनी आपल्या बोटावरील शाईची खूण दाखवली.
  • काँग्रेसचे नेते अमित देशमुख म्हणाले, "मी सर्व मतदारांना विनंती करतो की, त्यांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर बाहेर पडावे. शक्य तितके मतदान करावे."

07:14 May 07

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू, मतदान सुरू होण्यापूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी केली प्रार्थना

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशातील 17.24 कोटी मतदार आज मतदान करत आहेत.मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विदिशामधील भाजपचे उमेदवार शिवराज सिंह चौहान यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी सिहोरच्या जैत गावात त्यांच्या निवासस्थानी प्रार्थना केली. शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले की, " निवडणूक हा लोकशाहीचा 'महाउत्सव' आहे. मतदान हे लोकशाहीप्रती असलेल्या आपल्या समर्पणाचे प्रतीक आहे. मी प्रत्येकाला मतदान करण्याचे आवाहन करतो."

07:10 May 07

कर्नाटकमध्ये 25 ते 26 जागावर विजय मिळेल- बीएस येडियुरप्पा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी किमान 25 ते 26 लोकसभा मतदारसंघात विजयम मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

07:03 May 07

विक्रमी संख्येनं मतदान करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यात विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी एक्स मीडियावर सोमवारी संध्याकाळी पोस्ट करत म्हटले, 7 मे रोजी सकाळी मी अहमदाबादमध्ये मतदान करणार आहे. मी उद्या मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो.

07:02 May 07

हे दिग्गज आहेत निवडणुकीच्या रिंगणात

केंद्रीय मंत्री अमित शाह (गांधीनगर), ज्योतिरादित्य सिंधिया (गुणा), मनसुख मांडविया (पोरबंदर), परशोत्तम रुपाला (राजकोट), प्रल्हाद जोशी (धारवाड) आणि एसपी सिंह बघेल (आग्रा) हे दिग्गज उमदेवार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. सुरतमध्ये भाजापने बिनविरोध विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींचे राज्य असलेल्या गुजरातमधील 25 जागांसाठी आज मतदान होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ११ जागा, उत्तर प्रदेशातील 10 जागा, कर्नाटकातील 28 पैकी 14 , छत्तीसगडमध्ये सात, छत्तीसगडमध्ये पाच जागावर मतदान होत आहे. तर बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी चार आणि गोव्यातील दोन जागांवर मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीनगर तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अहमदाबादमध्ये मतदान करणार आहेत.

06:29 May 07

देशातील 93 मतदारसंघामध्ये आज होणार मतदान, वाचा लाईव्ह अपडेट्स

हैदराबाद- लोकशाहीतील उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरातील 93 जागांवर मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 जागांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अहमदाबादमध्ये मतदान करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 93 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. गुजरात, कर्नाटक, बिहार आणि या सर्व राज्यांमध्ये बहुमत मिळणार असल्याचा भाजपानं यापूर्वीच दावा केला आहे.

Last Updated : May 7, 2024, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.