ETV Bharat / politics

विदर्भाच्या रखरखत्या उन्हात तापणार राजकीय वातावरण; दिग्गज नेते करणार आपापल्या उमेदवाराचा प्रचार - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : एकीकडे विदर्भात सूर्य आग ओकत असताना रखरखत्या उन्हात विदर्भात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापतंय. विदर्भातील सहा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळं दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत.

विदर्भाच्या रखरखत्या उन्हात तापणार राजकीय वातावरण; दिग्गज नेते करणार आपापल्या उमेदवाराचा प्रचार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 2:24 PM IST

दिग्गज नेते करणार आपापल्या उमेदवाराचा प्रचार

नागपूर Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील प्रचार शिगेला पोहचलाय. लहान-मोठ्या नेते मंडळींची पावलं नागपूर आणि विदर्भाच्या दिशेनं वळली आहेत. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह नुकतेच शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झालेले गोविंदा देखील विदर्भात प्रचार करणार आहेत. रमेश चेन्निथला, मुकुल वासनिक, नाना पटोले, विजय वडेट्टीवार चंद्रपूर येथील सभेत सहभागी होणार आहेत. तर गोविंदा रामटेकमध्ये राजू पारवेंसाठी प्रचार करणार आहेत. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गडचिरोलीमध्ये भाजपा उमेदवारासाठी मत मागणार आहेत.

वंचित आघाडीसाठी आमचे दार उघडे : वंचित आघाडीसोबत काही दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. वंचित सोबत अनेक बैठक झाल्या, महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होत हे सांगता येत नाही. शेवटपर्यत चर्चा करण्यासाठी आमची तयारी असल्याचं काँग्रेस महासचिव मुकुल वासनिक म्हणाले. तसंच जिथं भाजपा आणि शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात अजून दहा जागेवर समाधानकारक चर्चा झाली नाही तरी तुम्ही आमचं विचारता, आमची चर्चा चांगली होत आहे. लवकर शेवटचा निर्णय येईल, असा विश्वासही मुकुल वासनिक यांनी व्यक्त केला.

जनतेच्या मदतीनं निवडणूक लढू : प्रचाराबाबत बोलताना काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले, "आमच्याकडे कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठीही पैसे उरले नाहीत. जनता आम्हाला मदत करेल आणि जनतेच्या मदतीनं आम्ही लढू, जिंकू असं आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत लोकांना वचन दिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वांना न्याय देण्यासाठी देशात 'इंडिया' आघाडीचं सरकार आणण्यासाठी आमचं काम सुरु आहे." तसंच नागपुरचे विकास ठाकरे आमचे सर्वात दमदार उमेदवार आहेत. ते जिंकणारे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीत एकत्रितपणे काम करत असताना जागा एकमेकांना शेअर कराव्या लागतात. आमचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत, भाजपाला पराभवाची भीती वाटतं आहे. आघाडीत असताना प्रत्येक पक्ष दावा करत असतो आज किंवा उद्या सांगलीचा विषय सुटलेला असेल असा दावाही रमेश चेनीथला यांनी केला.

राजू पारवेंच्या प्रचारासाठी गोविंदा सक्रिय : रामटेक लोकसभा मतदारसंघच्या निवडणूकीत आजपासून अभिनेते आणि माजी खासदार गोविंदासुध्दा सक्रिय झाले आहेत. आज गोविंदांचं नागपुरात आगमन झालं असून ते राजू पारवेंच्या प्रचारास सुरुवात करतील. यासंदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, "आता सुरुवात तर झाली आहे. सफलता मिळेलचं हा विचार करुन मी आलोय. मी रामटेकच्या भूमीला प्रणाम करतो. देवाजवळ प्रार्थना आहे जसं आधी झालं तसंच यावेळीही व्हावं. एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी तिकीट मागणार नाही आणि निवडणूक लढवणार नाही."

हेही वाचा :

  1. काँग्रेस नेतृत्वानं कार्यकर्त्यांची समजूत काढावी; सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांचा सल्ला - Sanjay Raut
  2. रश्मी बर्वे यांना निवडणूक लढविता येणार नाही, जात वैधता प्रमाणपत्रावर नागपूर खंडपीठाची अंतरिम स्थगिती - Lok Sabha Election 2024
  3. काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज - Vikas Thackeray File Nomination

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.