ETV Bharat / politics

सेक्स स्कँडलमधील आरोपी जेडीएस उमेदवार प्रज्वल रेवन्ना याचा दारुण पराभव - Lok Sabha election results 2024 - LOK SABHA ELECTION RESULTS 2024

Prajwal Revanna defeated सेक्स स्कँडलमधील आरोपी जेडीएस उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना याचा दारुण पराभव झाला आहे. रेवन्ना सध्या पोलीस कोठडीत आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर लगेचच त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 2:41 PM IST

बंगळुरू Prajwal Revanna defeated : कर्नाटकमध्ये गाजलेल्या सेक्स टेप प्रकरणातील आरोपी जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याचा पराभव झालेला आहे. कर्नाटकातील हसन मतदार संघातून त्याने निवडणूक लढवली होती. प्रज्वल रेवन्ना सध्या तुरुंगात आहे. येत्या ६ जूनपर्यंत त्याची रवानगी कोर्टानं पोलीस कोठडीत केली आहे. हसनमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पटेल विजय झाले आहेत. प्रज्ज्वल रेवन्नाला 5,02,297 मतं मिळाली आहेत. तर विजयी उमेदवार श्रेयस पटेल यांना 5,29,857 मतं मिळाली आहेत.

हसन लोकसभा मतदारसंघ माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा मतदारसंघ आहे. त्यांचा नातू प्रज्वल आहे. मात्र बलात्कार, लैंगिक छळ या प्रकरणामुळे प्रज्वलसह पक्षाला खूप मोठा फटका बसणार असं वाटत होतं. तसंच झाल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी देवेगौडा यांनी त्यांचे नातू प्रज्वल याच्यासाठी 2019 मध्ये हसनची जागा सोडली होती. आता त्याचा या ठिकाणी पराभव झाला आहे.

दरम्यान, प्रज्ज्वल रेवन्ना याच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ आणि बलात्काराचे आरोप केले होते. 26 एप्रिल रोजी दक्षिण कर्नाटकातील मतदारसंघात मतदान संपल्यानंतर काही तासांनंतर त्याच्यावर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मतदानावर काही परिणाम झाला असेल असं कुणालाही त्यावेळी वाटत नव्हतं. मात्र याता निकालानंतर प्रज्वलवर तेथील जनता नाराज होती हे आता स्पष्ट झालं आहे.

त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याआधीच ते भारत सोडत जर्मनीला निघून गेले होते. त्यानंतर देशभरात यावरून मोठं राजकरण तापलं होतं. यानंतर याप्रकरणी चौकशीसाठी कर्नाटक सरकारने एसआयटी तयार केली होती. भारताबाहेर असलेल्या प्रज्ज्वल रेवन्ना याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. पुढे प्रज्ज्वल रेवन्ना यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करत आपण भारतात येणार असल्याची माहिती दिली. तसंच त्यांनी एसआयटी चौकशीला आपण सामोरे जाण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. यानंतर भारतात आल्यावर अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

हेही वाचा...

  1. भाऊसाहेब वाघचौरेंना साईबाबा पावले; शिर्डीतून सदाशिव लोखंडेंचा पराभव
  2. सांगली लोकसभा निवडणूक निकाल : सांगलीची पाटीलकी कोणाकडे; विशाल, संजय की चंद्रहार?
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' समारंभ फिक्स; संजय राऊतांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.