ETV Bharat / politics

INDIA Rally Mumbai: "आता मोदी की गॅरंटी चालणार नाही, छोडो भाजपा आणि भाजपापासून मुक्ती असा नारा द्यावा" - शरद पवार - Lok Sabha Elections

INDIA Rally Mumbai : केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीचं मुंबईत रणशिंग फुंकलंय. या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय.

INDIA Rally Mumbai: "आता मोदी की गॅरंटी चालणार नाही", शरद पवारांची टीका; तर आंबेडकर म्हणतात परिवारवादातून काँग्रेसपक्षानं बाहेर पडावं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 9:14 AM IST

Updated : Mar 18, 2024, 9:37 AM IST

शरद पवार

मुंबई INDIA Rally Mumbai : केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुक कार्यक्रमाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर मुबंईतील शिवाजी पार्कवर 'इंडिया' आघाडीची पहिली जाहीर सभा पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'मोदी की गॅरंटी'वरुन नरेंद्र मोदींवर टीका केली.

भाजपापासून मुक्ती : विरोधकांच्या या सभेत शरद पवार म्हणाले की, "देशात जी परिस्थिती आहे, त्यात बदल करण्याची गरज आहे. आपल्याला सर्वांनी मिळून हा बदल घडवायचा आहे. त्यातून बदल घडू शकतो. ज्या लोकांनी देशाला वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देऊन फसवलं, त्यांना मतदानाच्या माध्यमातून दूर करावं लागेल. ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी अनेक आश्वासन दिली होती. आश्वासन देऊन पूर्ण करत नसलेल्या लोकांना सत्तेपासून दूर केलंच पाहिजे. आपल्याला पुढील महिन्या संधी मिळालीय." पुढं बोलताना पवार म्हणाले, "टीव्हीवर आपण मोदी की गॅरंटी ऐकलीय. मात्र आता मोदी की गॅरंटी चालणार नाही. महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये छोडो भारतचा नारा दिला होता. याचं शहरातून आपण छोडो भाजपा आणि भाजपापासून मुक्ती असा नारा देण्याचा निर्धार करायला हवा," असं आवाहन शरद पवार यांनी केले.

सोबत असो किंवा नसो लढावं लागेल : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी आणि इंडिया सोबत आहे की नाही, याविषयी संभ्रम मिटलेला नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांना सभेसाठी निमंत्रण दिल्यानंतर सभेला हजेरी लावली. " आपणाला ईव्हीएम विरोधात लढा उभारावा लागणार आहे. यात राहुल गांधींनी पुढाकार घ्यावा. आपण सोबत राहू, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. लोकसभा निवडणुकीत आपण सोबत असू किंवा नसू मात्र भाजपाच्या विचारधारेविरोधात आपल्याला लढावं लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मोदींनी पत्नीला सोबत ठेवावं- "इलेक्ट्रोल बाँड कोणी दिले? त्यांच्याकडं एवढे पैसे कुठून आले, याचं उत्तर आम्ही मोदी आणि शाहांना विचारणार की नाही," असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला. "मोदी सांगतात हा देश माझा परिवार आहे. कुटुंबाचा मुद्दा मोदी आणत आहेत. पण, ते त्यांच्या पत्नीला सोबत ठेवत नाही. आपण मोदींना म्हटलं पाहिजे की, त्यांनी हिंदू संस्कृतीचं पालन करुन पत्नीलासोबत ठेवायला हवे. हा जरी त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून याची आठवण संघ आणि भाजपाला करुन द्यायला हवी, असं आंबेडकर म्हणाले.

कॉंग्रेसनं घराणेशाही तन बाहेर पडावं : पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, " आपण 2004 पासून ईव्हीएमविरोधात लढत आहोत. या लढतीत आपण पुढाकार घ्यावा, असं आवाहन आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना केलंय. यात सोबत असल्याचं त्यांनी आश्वासनदेखील दिलंय. पेपर ट्रेलचं काऊंटिंग झालं पाहिजे, याची मागणी राहुल गांधींनी संसदेत करावी. तसंच जनतेला स्वच्छ चारित्र्याचे लोक हवे असल्यानं आम्ही सोबत आहोत. मात्र घराणेशाहीतून काँग्रेस पक्षानं बाहेर पडावं, असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi Speech : देशाच्या राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआयमध्ये; राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
  2. Uddhav Thackeray Speech :"खुर्ची आणि ते इतकाच मोदींचा परिवार", उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

Last Updated : Mar 18, 2024, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.