पाटणा : लोकसभा निवडणुकीचे मंगळवारी जाहीर होताच सत्तास्थापना करण्याकरिता इंडिया आघाडीसह एनडीएकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एनडीएकडून सत्तास्थापन करण्याकरिता रणनीती आखण्यात येत आहे. त्या संदर्भात आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला हजर राहण्याकरिता बिहारचे मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत तेजस्वी यादव यांनी विमानातून प्रवास केल्यानं नवीन राजकीय तर्कवितर्क लढविण्यात आहेत.
नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडीत परतणार?इंडिया आघाडीनं एक्झिट पोलचे अंदाज चुकवित एनडीएला आव्हान दिलं आहे. त्यानंतर इंडिया आघाडीचीही दिल्लीत बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीला राजदचे नेते तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत. सूत्राच्या माहितीनुसार नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे दिल्लीला आज सकाळी पावणे अकरा वाजता एकाच विमानातून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात इंडिया आघाडीच्या बाजूनं पारडं झुकल्यानंतर नितीश कुमार हे पुन्हा इंडिया आघाडीत परतू शकतात, अशी चर्चा सुरू झाली.
एनडीएला देशात 292 जागांवर विजय- लोकसभेच्या 543 जागांपैकी एनडीएने 292 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपाला 240 जागा मिळाल्या आहेत. इतर पक्षांच्या उमेदवारांनी 51 जागा जिंकल्या आहेत. एनडीएला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ३२ जागांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत एनडीएकडून मित्रपक्षाची मनधरणी सुरू आहे.
- इंडिया आघाडीला 200 जागांवर विजय: इंडिया आघाडीनं 200 जागा जिंकल्या असल्या तरी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 72 खासदारांची गरज आहे. संख्याबळाची जुळवाजुळव करण्याकरिता इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होत आहे. नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर त्याचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो.
बिहारमध्ये एनडीएला 30 जागांवर विजय : बिहारबद्दल एनडीएला 40 पैकी 30 जागांवर विजय मिळाला. इंडिया आघाडीला 9 जागांवर तर अपक्ष पप्पू यादव 1 जागेवर विजयी झाले आहेत. एनडीएने जिंकलेल्या 30 जागांपैकी भाजपा आणि जेडीयूने प्रत्येकी 12 जागा जिंकल्या आहेत. चिराग पासवान यांच्या पक्षानं 5 जागा जिंकल्या आहेत, एचएएम पक्षाचे जीतन राम मांझी यांनी एक जागा जिंकली आहे. इंडिया आघाडीतील राजदनं 9 पैकी 4 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस 3 आणि सीपीआय (एमएल) 2 जागा आहेत.
हेही वाचा-