मुंबई Gopikishan Bajoria : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लिफ्टमधून एकत्र गेले. तर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावरुन चर्चांना उधाण आलं असून, ठाकरे-फडणवीस भेटीवेळी अनेक कार्यकर्ते, आमदार उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेतून निवृत्त झालेले शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार विप्लव बजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बजोरिया हे देखील हजर होते. तर या दोघांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली असून, हे लवकरच त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी चालवल्या. यावर आज माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना खुलासा करावा लागला आहे.
वृत्त खोडसाळपणाचे : मी ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त टीव्ही चॅनेल्स तसेच अन्य माध्यमांनी चालवलं. आज या संदर्भात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. मात्र, हे वृत्त साफ खोटे आणि खोडसाळपणाचे असल्याचं माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय.
आपण शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार आहोत. मी कुठेही जाणार नाही. मी शिवसेनेत राहणार. - गोपीकिशन बजोरिया, माजी आमदार
अन्यथा कोर्टात जाणार : जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे लिफ्टमध्ये जाण्यासाठी थांबले होते. तेव्हा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. मी त्या दोघांना नमस्कारसुद्धा केला नाही किंवा भेटलो नाही. पण माझ्याविषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. ठाकरे गटाची विश्वासाहर्ता संपली आहे म्हणून ते खोट्या बातम्या देऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ज्यांनी या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांनी पुढे येऊन याचा खुलासा करावा किंवा माफी मागवी अन्यथा त्यांच्याविरोधात मी कोर्टात धाव घेणार असल्याचा इशारा, माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांनी दिला आहे.
हेही वाचा -