ठाणे Lok Sabha Election 2024 : जेमतेम ११ वी पास ठाणे लोकसभेचे उबाठा गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे (Rajan Vikhare) यांची २५ कोटीहून अधिक संपत्ती असल्याचं विवरण त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जात दिलं आहे. २०१९ च्या तुलनेत मागील पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत ११ कोटीची वाढ झाली आहे.
सव्वातीन कोटीचे कर्ज : विचारे कुटुंबाकडं २०१९ साली पाच वाहने होती, आता तीनच वाहने आहेत. तर त्यांच्यावर सव्वातीन कोटीचे कर्ज असून सहा गुन्हे दाखल असल्याचं त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
एकूण किती आहे संपत्ती : मुंबईतील महाविद्यालयातून ११वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विचारे यांची एकूण संपत्ती २५ कोटी ८२ लाख ९७ हजार आहे. त्यांच्याकडं एक लाख २० हजाराची रोकड आहे. तर पत्नी नंदिनी विचारे यांच्याकडं ६० हजाराची रोकड आहे. जंगम मालमत्ता एक कोटी ३२ लाख ५५ हजार, तर पत्नीकडं दोन कोटी ४० लाख, स्थावर मालमत्ता पाच कोटी ६४ लाख ४५ हजार आहे.
खासदार विचारे यांच्या विरोधात सहा गुन्हे : खासदार विचारे यांच्यावर तीन कोटी २४ लाख ७८ हजाराचे कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीवर ९४ लाख २० हजाराचे कर्ज आहे. वारसा हक्कानं १६ लाख ९४ हजाराची संपत्ती त्यांना मिळाली असून खासदार विचारे यांच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. पाच वर्षापूर्वी गुन्ह्यांची संख्या नऊ होती. विचारे यांच्याकडं एक चारचाकी गाडी आहे. तर पत्नीकडं दोन गाड्या आहेत. रत्नागिरी आणि अलिबाग येथे शेतजमीन तर चरई येथे सदनिका आणि शहरातील विविध भागात खासदार विचारे आणि त्यांच्या पत्नीकडं पाच दुकाने आहेत. मागील वर्षी त्यांची एकूण संपत्ती १४ कोटी ५९ लाख ८० हजार इतकी होती.
हेही वाचा -
- राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज; मला तिसऱ्यांदा खासदार म्हणून जनता निवडून देईल - राजन विचारे - Lok Sabha Election 2024
- दक्षिण मध्य मुंबईत दोन मित्र भिडणार; राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांनी भरला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Election 2024
- देशात निवडणुकीचे वारे, मात्र ठाण्यात सर्वकाही सामसूम; अख्ख्या भारतात एकमेव मतदारसंघ शांत - Lok Sabha Election 2024