नवी दिल्ली ECI on NCP SCP Voluntary Contributions : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केंद्रीय निवडणूक आयोगानं देणगी स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. कलम 29 ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शरद पवार यांनासुद्धा मोठा दिलासा मिळाला.
लाईव्ह | पत्रकारांशी संवाद | 🗓️08-07-2024 https://t.co/vfF462sw12
— Supriya Sule (@supriya_sule) July 8, 2024
सुप्रिया सुळेंनी घेतली निवडणूक आयोगाची भेट : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून ऐच्छिक देणगी स्वीकारण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेली मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. NCP-SCP च्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील 8 सदस्यीय शिष्टमंडळानं सोमवारी निवडणूक आयोगाची निर्वचन सदन येथे भेट घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगानं याबाबत अधिकृत पत्र काढलं व मान्यता दिली.
शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारता येणार : लोकप्रतिनिधीच्या कलम 29 B आणि कलम 29C नुसार सरकारी कंपनी व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीने स्वेच्छेने देऊ केलेली कोणतीही देणगी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अधिकृत केले आहे, अशी माहिती ECI ने आपल्या 8 जुलै 2024 रोजीच्या पत्रात दिली आहे. या निर्णयामुळं शरद पवार यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला चांगलं यश : आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले होते. यानंतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला खरा पक्ष म्हणून मान्यता दिली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी शरद पवार गटाला घवघवीत य़श दिल्यानं निवडणूक आयोगाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : फुकटचे निर्णय हिताचे नसतात; शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला - Sharad Pawar On Farmers