पुणे Prasanna Jagtap : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) जाहीर होईल. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. प्रत्येक विधानसभा मतदार संघानुसार भारतीय जनता पक्षाकडून माहिती मागवली जात आहे. तसंच पुणे शहरात भारतीय जनता पक्षाकडून पुण्यातील आठही मतदार संघात पदाधिकाऱ्यांचं गुप्त मतदान पार पडलं.
स्थानिक आमदारांकडून माझ्यावर अन्याय : खडकवासला मतदारसंघात (khadakwasla Constituency) भाजपाच्या बैठकीत आमदार भीमराव तापकीर त्याचबरोबर इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप, भाजपा नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात खडाजंगी झाली. "मी इच्छुक असताना मला माहितीच दिली गेली नाही. स्थानिक आमदारांकडून माझ्यावर अन्याय झाली" असं यावेळी माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी सांगितलं.
पदाधिकाऱ्यांच गुप्त मतदान : मंगळवारी पुण्यातील आठही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून पदाधिकाऱ्यांचं गुप्त मतदान पार पडलं. खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर यांच्याकडून त्यांच्याच जवळच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आणि आम्हाला अचानकपणे कार्यक्रम असल्याची माहिती दिली, असा वाद होऊन, इच्छुक उमेदवारांचं गुप्त मतदान होत असताना, पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर आमदार भीमराव तापकीर आणि इच्छुक उमेदवार याच्यात खडाजंगी झाली. खडकवासला मतदारसंघात भाजपामध्येच उमेदवारीवरून दोन गट पाहायला मिळत आहेत. भाजपा आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात पक्षांतर्गतच नाराजी येथील खडाजंगीवरुन पाहायला मिळत आहे.
माझ्यावर अन्याय झाला : यावर इच्छुक उमेदवार प्रसन्न जगताप म्हणाले, "मंगळवारी पक्षाकडून इच्छुक उमेदवारांसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. खडकवासला मतदारसंघाची बैठक पार पडत असताना, मला एसएमएसद्वारे फक्त माहिती देण्यात आली. कोणताही कॉल करण्यात आला नाही. तरीही मी कार्यक्रमाला गेलो. इतरांना बोलू दिलं, परंतु मला बोलू दिलं नाही. मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यानं मी तिथेच न बोलता बसलो. पण माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कळवणार आहे. खडकवासला मतदारसंघातून मी इच्छुक आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आणणार. पण मी केलेल्या सर्व्हेमध्ये पुण्यातील आठही मतदार संघापैकी सर्वाधिक मताधिक्याने मी विजयी होणार असं मी केलेल्या सर्व्हेतून समोर आलं आहे."
पक्षश्रेष्ठी मत घेणार जाणून : याबाबत शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, मंगळवारच्या कार्यक्रमात भाषण तसंच आपलं मत मांडणं असं काहीही नव्हतं. आलेल्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून इच्छुक उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी घेऊन ती बंद पेटीत टाकणं एवढंच काम होतं. तसंच ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांच्याकडून पक्षश्रेष्ठी माहिती घेऊन त्यांचं मत जाणून घेणार आहेत. पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकाचं मत पक्षाकडून जाणून घेतलं जाणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही.
हेही वाचा -
- "राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमधून निवडणूक लढवावी", बाळासाहेब थोरातांचं खुलं आव्हान - Balasaheb Thorat on Vikhe Patil
- "महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते निराशेत"; खुद्द अमित शाहांचीच कबुली, म्हणाले, स्वबळावर... - BJP Mumbai meeting
- "उद्धव ठाकरेंच्या रॅलीत हिरवे झेंडे..." देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल - Maharashtra Assembly Election 2024