ETV Bharat / politics

"...तर मी राजकारणातून संन्यास घेईन", असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnavis News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 6:51 PM IST

Devendra Fadnavis On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच गंभीर आरोप केलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचय. पण देवेंद्र फडणवीस तसं होऊ देत नाहीत, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय. यावरच आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय.

Devendra Fadnavis reply to Manoj Jarange Patil Allegations says I will retire from politics
देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)

मुंबई Devendra Fadnavis On Manoj Jarange : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन राजकारण तापल्याचं पाहायला मिळतय. मराठा समाजातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या सर्वात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सातत्यानं आरोप करताना दिसून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणासाठी काम करायचं आहे. त्यांना सगेसोयरे वर्गातून आरक्षण देण्याची इच्छा आहे. पण देवेंद्र फडणवीस त्यांना काम करून देत नाहीत, असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय. त्यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलय. "मराठा आरक्षणासाठी मी कोणत्याही प्रकारची आडकाठी आणली असल्याचं सिद्ध झाल्यास, त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईन", असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ते मुंबईत बोलत होते.

सर्व निर्णय घ्यायचे अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतात. आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करत असतो. परंतु, मी मनोज जरांगे पाटलांना इतकंच सांगेन की, त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारावं. जर ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये आडकाठी आणली. तर मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले. तसंच आपण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं निर्णय केले असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक निर्णयासोबत आपण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

रामदास कदमांच्या आरोपांनाही दिलं प्रत्युत्तर : शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गावरुन हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, असंही ते म्हणाले. यावर प्रतिक्रिया देत फडणवीस म्हणाले, "रामदास कदम यांचे आरोप कोणत्याही युती धर्मात बसत नाहीत. त्यांनी आपलं म्हणणं पक्षांतर्गत मांडायला हवं. त्यांनी प्रत्येकवेळेस भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर आरोप करणं योग्य नाही. असं असलं तरी रामदास कदम यांचं म्हणणं मी समजून घेईन आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करेन", असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रत्येक गोष्टीत राजकारण करणं चुकीचं : विधानसभा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. यावरुन फडणवीस म्हणाले, "केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा घोषित करतात. काही राज्यांतील निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्या असून महाराष्ट्रातील तारखांचाही ते लवकरच खुलासा करतील. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं चुकीचं आहे."

हेही वाचा -

  1. ...‘त्यांना’ राज्यात दंगली घडवायच्यात; मनोज जरांगेंचा फडणवीस आणि भुजबळांवर आरोप - Manoj Jarange Patil
  2. "महाविकास आघाडीत लाडकी मुलगी, लाडका मुलगा या दोनच योजना"; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना टोला - Devendra Fadnavis News
  3. शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन हे देवेंद्र फडणवीसांचं कारस्थान; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप - Manoj Jarange Patil

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.