पुणे Devendra Fadnavis : लोकसभेत महायुतीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता विधानसभेसाठी (Vidhan Sabha Election) जोरदार तयारी सुरू केली. लोकसभेत विरोधकांनी खोटं नॅरेटीव्ह सेट केलं होतं. त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांना उत्तर देण्यासाठी थेट मैदानात उतरण्याचा सल्ला दिला. पण मैदानात उतरताना 'हिटविकेट' होऊ नका, असं देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
अटलबिहारी, मोदींमुळं आरक्षण मिळालं : "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही मर्यादित काळासाठी आरक्षण दिलं होतं. तो काळ संपत असताना युतीचे सरकार होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला होता. अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाची सीमा वाढवल्याने या देशात संविधानानं दिलेलं आरक्षण सामान्य लोकांना मिळत आहे," असं म्हणत आरक्षणा मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला डिवचलं.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे : "राज्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक समाज एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. काही नेत्यांना वाटते हे समाज जर एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ, ते (विरोधक) केवळ राजकारण करु पाहत आहेत. सरकार येते जाते, पण समाज एकसंध राहिला पाहिजे. समाजातील दुफळी लवकर दूर होणार नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे," असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाबाबतची भूमिका मांडली.
'मविआ'नं मराठा आरक्षण टिकवलं नाही : "शरद पवार यांनी का आरक्षण दिले नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हे कोण म्हटले हे सर्व समाजाला माहिती आहे. आम्ही आरक्षण दिले आणि ते टिकवलेसुद्धा. पण मविआचे सरकार आले आणि त्यांनी ते टिकवले नाही. पुन्हा आमचे सरकार आल्यावर आरक्षण दिले. जरांगे यांच्या आंदोलनाबाबत तुमची भूमिका काय आहे? दुटप्पी भूमिका घेऊ नका. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्सासाठी तुमचे समर्थन आहे का?" असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना विचारला आहे. "दोन्ही समाजाला अंधारात तरी ठेवू नका. समाजाला न्याय मिळवून देण्सासाठी आमची शिव्या खाण्याची तयारी आहे. पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही," असा इशारा फडणवीसांनी दिला. आहे.Conclusion:
बॅटिंग करायला मैदानात उतरा : पुण्यातील बालेवाडी येथे रविवारी (21 जुलै) भाजपाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस म्हणाले की, "आपल्यात अनेक लोक असे आहेत जे विरोधकांना उत्तरच देत नाहीत. आज तुम्हाला मी परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करावी. मैदानात उतरा, पण अट एकच आहे की 'हिटविकेट' व्हायचं नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असं काही बोलतात की, चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात."
पूर्ण बहुमताने निवडून आलो : फडणवीस पुढे म्हणाले की, "बावनकुळे यांनी सांगितलं की, 2013 ला येथेच अधिवेशन झालं आणि 2014 ला आपण पूर्ण बहुमताने निवडून आलो. आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय आणि मी सांगतो की, लिहून ठेवा या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल. खोटा नरेटिव्ह विरुद्ध लढताना कुठेतरी आपण आता (लोकसभा) कमी पडलो."
फुगा फोडण्याची सुरुवात : "एखाद्या निवडणुकीत मिळालेला विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना तर हा (विरोधकांचा) फुगा फुटू शकतो. हा फुगा फोडण्याची सुरुवात विधानपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे. आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली आणि तुमचे 20 आमदार आमच्याकडे कधी आले हे तुम्हाला समजलं देखील नाही." असं यावेळी फडणवीस म्हणाले.
हेही वाचा -
- ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनाचं आज उद्घाटन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री लावणार हजेरी - Shivaji Maharaj Waghnakh
- देवेंद्र फडणवीस -अजित पवारांचं हेलिकॉप्टर भरकटलं : अजित पवारांनी सांगितला थरारक अनुभव - Devendra Fadnavis
- ड्रग्जविरोधात सरकार अॅक्शन मोडवर, पाच महिन्यात केला ४ हजार कोटींचा माल जप्त, ६ पोलीस बडतर्फ - State Government Action On Drug