ETV Bharat / politics

"विरोधक अमेरिकेत जाऊनही उद्घाटन करू शकतात..." उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला - Devendra Fadnavis On MVA - DEVENDRA FADNAVIS ON MVA

Devendra Fadnavis On MVA : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग अखेर प्रवाशांसाठी सुरू झालाय. या मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन करण्यात आलंय.

Devendra Fadnavis On MVA
देवेंद्र फडणवीसांचा टोला (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 4:37 PM IST

Updated : Sep 29, 2024, 5:02 PM IST

पुणे Devendra Fadnavis On MVA : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गिकेचं ऑनलाईन पद्धतीनं उदघाटन झालं. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पुण्यातील स.प महाविद्यालय येथं होणार होता. मात्र, पावसामुळं हा कार्यक्रम रद्द झाला. या रद्द झालेल्या कार्यक्रमावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. या टिकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात विरोधकांना उत्तर दिलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गिकेचं ऑनलाईन उदघाटन झालं. तसंच स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेचं म्हणजेच भिडे वाड्याच भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat Reporter)

जनतेशी काही देणं घेणं नाही : यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं उद्घाटन झालं ही अतिशय आनंदाची बाब आहे. पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादानं 2016 मध्ये या कामाला सुरुवात झाली आणि आज हा 30 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला. स्वारगेट स्थानक अतिशय आधुनिक आणि देशातील सर्वात मोठं स्थानक आहे." विरोधकांनी उद्घाटनाबाबत केलेल्या टिकेबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "विरोधकांना पुण्यातील जनतेशी काही देणं घेणं नाही. त्यांनी पुण्यातील जनतेचा विचार केला असता, तर 2008 मध्ये त्यांनी या कामाला सुरुवात केली असती. त्यांनी काहीही केलं नाही. त्यांच्याकडून फक्त टिका करण्याचं काम सुरू आहे, हे हास्यास्पद आहे."

पुणेकरांना मिळणार दिलासा : उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं उद्घाटन झालं असून भविष्यात आणखी अनेक टप्पे जोडणार आहोत. पुणेकरांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाचं शुभारंभ आणि भूमिपूजन झालंय. या प्रकल्पामुळं वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळणार. टप्पटप्यानं याचं काम केलं जाईल. वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प उत्तम पर्याय ठरणार आहे."

हेही वाचा

  1. शिंदे गटानं गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा-संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Sanjay Raut news today
  2. "पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार कशी?", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल - CM Eknath Shinde
  3. "सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची वाट खुली केली, तर सरकारनं 'लाडकी बहीण योजने'तून..." - CM Eknath Shinde On Phule

Last Updated : Sep 29, 2024, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.