ETV Bharat / politics

...तर माझ्यावर हक्कभंग आणा; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना आव्हान - Devendra Fadnavis News - DEVENDRA FADNAVIS NEWS

Devendra Fadnavis News : नीट आणि युजीसी नेट परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीवरून देशभरात विरोधक आक्रमक होत आहेत. आज विधान परिषदेत (Vidhan Parishad) विरोधी पक्षाने नोकरभरतीचा मुद्दा आणि पेपरफुटीच्या प्रश्नावर सरकारला घेरलं. यावेळी विरोधकांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं.

Devendra Fadnavis News
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 10:08 PM IST

मुंबई Devendra Fadnavis News : महाराष्ट्र विधिमंडळाचा आजचा सहावा दिवस असून विरोधकांनी सरकारला पेपरफुटी प्रकरणावरून विधान परिषदेत (Vidhan Parishad) घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मी दिलेली माहिती अधिकृत आहे. खरी नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणावा असं आव्हान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषद सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना दिलं.

57,452 लोकांच्या नियुक्त्या : विधानपरिषद सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाकडून नोकरभरती संदर्भात विषय मांडला गेला. महायुती सरकारनं नोकर भरतीत पारदर्शकता आणून विक्रम केलाय. महायुती सरकारनं 75000 पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 57,452 लोकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यासोबत 19,853 लोकांची परीक्षा घेण्यात आली आहे. त्यांना पुढील महिन्यात नियुक्ती आदेश देखील देण्यात येतील. याचाच अर्थ 77,305 लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

एकही पेपर फुटीचा प्रकार घडला नाही : तीन महिन्यात 31201 पदांच्या नियुक्ती आदेश देऊन एक लाख नोकऱ्या देण्याचा विक्रम आमच्या सरकारनं केलाय. ही सर्व प्रक्रिया होत असताना एकही पेपर फुटीचा प्रकार घडला नसल्याचा दावाही फडणवीस यांनी केलाय. तसंच एकही पेपर फुटीची एफआयआर नसल्याचं त्यांनी म्हटलंय. पेपर फुटीतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनात कायदा करणार असून त्याविषयी नव्या कायद्याचं विधेयक मांडणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

मी अधिकृत माहिती देतो, खरं नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा. परीक्षेला बोगस उमेदवार बसवून कॉपी करतानाच्या 48 घटना घडल्या आहे. यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली नाही. फक्त नरेटिव्ह तयार केलं जात आहे. - देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री

खोटे नरेटिव्ह बंद करा : विरोधक खोटे नरेटिव्ह पसरवत आहेत. अर्थव्यवस्था मागे पडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मात्र महाराष्ट्र अर्धा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमिकच्या जवळ पोहोचले असल्याची माहिती, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. गेल्या वर्षभरात सहा लाख कोटींनी आपली अर्थव्यवस्था विकसित झाली आहे. 2014 ते 19 साली मी मुख्यमंत्री असताना गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर गुजरात आणि कर्नाटक यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. आता पुन्हा महायुती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे.

प्रकल्प कोठेही गेला नाही : जलयुक्त शिवार योजना बंद केली नसती तर राज्यात कुठे पाण्याची कमतरता नसती असं विरोधी पक्षांनी मान्य केलं होतं. तसंच उद्योग गुजरातला चालले हे खोटं आहे. गेल इंडिया प्रकल्प कोठेही गेला नाही, नरेटिव्ह तयार करण्यात येत आहे. मलबार गोल्डची 1700 कोटीची गुंतवणूक झाली आहे. मुंबई डायमंड मॅन्युफॅक्चरर आणि एक्सपोर्ट हब आहे. त्यामुळं इथून कोणतेही उद्योग बाहेर गेले नाहीत. आता स्मार्ट मीटर ही नवीन खोटी नरेटिव्ह सुरू झाली आहे. स्मार्ट मीटर योजना ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात आली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असं फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.

दोन अपक्ष उमेदवार अर्ज बाद : विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या 11 जागासाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज पडताळणी समितीनं आज अपक्ष अर्ज दाखल केलेल्या अजय सिंग सेंगर आणि अरुण जगताप या दोन्ही अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद केला आहे. कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यामुळं त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. आता विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात १२ उमेदवार असून अर्ज माघारी घेण्याची मुदत 5 जुलै आहे. निवडणूक होणार की, कोणी अर्ज माघारी घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा -

  1. विधिमंडळ समित्या का रखडल्या ; राजकीय पक्ष आहेत का जबाबदार ?, जाणून घ्या सविस्तर - Maharashtra Legislative Committees
  2. हे सरकार शब्द देणार अन् शब्द पाळणारं आहे, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
  3. गट क कर्मचाऱ्यांच्या परीक्षा एमपीएससी मार्फत; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Devendra Fadnavis in Vidhansabha

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.