ETV Bharat / politics

नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणातच म्हणाले... - Navneet Rana

Navneet Rana : सर्वोच्च न्यायालयानं अमरावती लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवर नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल दिलाय. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालाचं स्वागत केलंय.

DCM Devendra Fadanvis
नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणातच म्हणाले...
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 2:35 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती Navneet Rana : अमरावती लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवर नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. हा निकाल येताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालाचं स्वागत करत जाहीर सभेत नवनीत राणा यांचं अभिनंदन करत आता विरोधकांच्या तोंडावर कुलूप लागेल असं म्हटलंय.

लोकही देतील योग्य निकाल : अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. याचवेळी सर्वोच्च न्यायालायनं त्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणात दिलासा दिला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सर्वोच्च नायालयानं सकारात्मक निकाल दिलाय." तसंच आता अमरावतीत 26 एप्रिलला अमरावतीची जनता देखील नवनीत राणा यांच्या बाजूनं आपला निकाल देईल असा विश्वासदेखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नवनीत राणांनी केलं जनतेला अभिवादन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायलायाचा निर्णया सभामंचावर जाहीर करताच नवनीत राणा यांनी उभं राहून सभेला उपस्थित जनतेला अभिवादन केलं. यावेळी सभास्थळी नवनीत राणांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

अमरावती शहरात मिरवणूक : खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर, रिपाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी खुल्या जीपमध्येच पार होऊन दसरा मैदान येथून इरविन चौकाच्या दिशेनं मिरवणूक काढली. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात थाटण्यात आलेल्या नवनीत राणा यांच्या प्रचार कार्यालयाचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.

आज केला निकाल जाहीर : मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवलं होतं. त्यानंतर त्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसंच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्णही झाला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला. यानंतर आज याप्रकरणी अंतिम निकाल जाहीर केला.

हेही वाचा :

  1. उमेदवारी अर्ज भरायला निघालेल्या नवनीत राणांना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द - Navneet Rana
  2. "प्रचाराच्या पोस्टरवरुन माझा फोटो काढा अन्यथा...", नवनीत राणांविरोधात महायुतीतील अजून एक नेता आक्रमक - Amravati Lok Sabha Constituency

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.