मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे कुर्ला संकुलात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा' पार पडत आहे. या सभेच्या माध्यमातून मुंबईतून मविआच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे. काँग्रेसर्फे या सभेत विविध गॅरंटी जाहीर करण्यात आल्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सर्वच महिलांना राज्यभर मोफत प्रवासाची राहुल गांधींनी घोषणा केली.
राज्याचा स्वाभिमान गुजरातकडं गहाण : राज्यातील महायुती सरकारने राज्याचा स्वाभिमान गुजरातकडं गहाण ठेवला आहे. त्यामुळं राज्यात मविआचं सरकार आणून हा स्वाभिमान परत आणला जाईल. काँग्रेसनं ज्या गॅरंटी जाहीर केल्या त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे, त्यामुळं याबाबत भाजपा करत असलेले फेक नॅरेटिव्ह जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळं जनता भाजपाच्या या खेळीला बळी पडणार नाही आणि मविआच्या पाठीशी ठामपणे उभी राहून मविआचं सरकार राज्यात सत्तेवर आणेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
जाहीर नाम्यातील प्रमुख गोष्टी...
1- युवकांना प्रति महिना 4 हजार रुपये
2- कुटुंबांना 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा
3- जातीनिहाय जनगणना करणार
4- 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार
5- प्रत्येक महिलेला प्रति महिना 3 हजार रुपये
6- महिलांना बस प्रवास मोफत करणार
ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडं आंबेडकरांचे संविधान, प्रेम, एकता आणि दुसरीकडं भाजपा आरएसएसचा मागून संविधान हटवण्याचा प्रयत्न खुलेपणाने केला तर पूर्ण देश त्यांच्या विरोधात उभा ठाकेल. - राहुल गांधी,विरोधी पक्षनेते
महाराष्ट्र गुजरातला गहाण : संविधानाला संपवण्याचं काम मोदी सरकारनं सुरू केलं. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारनं महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवण्याचं काम केलं. मोदी शाह यांनी राज्याला एटीएम बनवलं आहे. तर राज्याला लुटून दुसऱ्यांना श्रीमंत बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. संविधानाच्या पुस्तकाच्या लाल रंगाला फडणवीसांनी नक्षलवाद संबोधलं. तर लाल रंग आमच्या संस्कृतीत शुभ मानला जातो. शुभ प्रसंगी लाल रंगाचा वापर होतो. एकीकडं हिंदूचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे असा प्रकार करायचा असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
निवडणुकासाठी गॅरंटी : या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार असल्याची माहिती, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेते दिवाकर रावते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित आहेत.
हेही वाचा -
- "काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला", योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
- अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घोषणापत्र प्रसिद्ध, 'लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणार;' अजित पवारांचं आश्वासन
- "20 तारखेला बकरीला कापू," सुनील राऊतांचं वादग्रस्त विधान; आक्षेपार्ह विधानांमुळे विरोधक वारंवार अडचणीत, नेमकी कारणं काय?