ETV Bharat / politics

काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज - Vikas Thackeray File Nomination

Vikas Thackeray File Nomination : नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी (Nagpur Lok Sabha Constituency) आज महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी काँग्रेसमधील अनेक मोठे नेते उपस्थित होते.

Vikas Thakre
काँग्रेस आमदार विकास ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 5:04 PM IST

काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

नागपूर Vikas Thackeray File Nomination : महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून (Nagpur Lok Sabha Constituency) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महाविकास आघाडीतील स्थानिक प्रमुख नेत्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी काँग्रेसकडून मोठं शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं.

रश्मी बर्वे भरणार अर्ज : संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर विकास ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. काँग्रेसमधील विभागलेले सर्व गट एकत्र आल्यानं विकास ठाकरे यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसून येत होता. विकास ठाकरे यांच्यासह रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) या देखील उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी शक्यता होती. मात्र, रश्मी बर्वे उद्या अर्ज भरणार आहेत. काही दिवसांपूर्वी बर्वे यांना जात पडताळणी विभागानं नोटीस बजावली होती. त्यामुळं त्या उद्या अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय रामटेक मतदारसंघात काँग्रेसकडून किशोर गजभिये देखील दुसरे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

अनेक मोठे नेते उपस्थित : विकास ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना, काँग्रेसमधील अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेतेही उपस्थित होते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांसह छोट्या आणि मोठ्या पक्षांचे नेते उपस्थित होते.

नितीन गडकरींविरुद्ध विकास ठाकरे थेट लढत : नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार विकास ठाकरे विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यामध्ये थेट सामना होणार असल्याचं स्पष्ट झालय. काँग्रेस पक्षानं नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवण्यास आमदार विकास ठाकरे यांच्याकडं जबाबदारी सोपवली आहे. यासंदर्भात विकास ठाकरे यांना विचारलं असता पक्षानं माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्यामुळं मी लढाईसाठी पूर्णपणे तयार असल्याचं म्हंटलय. नागपूर लोकसभा मतदारसंघात अनेक मुद्दे आहेत त्या आधारावर मी निवडणूक लढणार आहे.

हेही वाचा -

  1. संजय राऊतांच्या निशाण्यावर पुन्हा मोदी-शाह, म्हणाले ईदी अमिन हा नरभक्षक, ते... - Sanjay Raut News
  2. माढा लोकसभा मतदारसंघातून मविआ कोणाला मैदानात उतरवणार? दिवंगत गणपत देशमुखांच्या शिष्याचं नाव चर्चेत - Lok Sabha Elections
  3. प्रकाश आंबेडकरांचा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न फसणार? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत - PRAKASH AMBEDKAR

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.