मुंबई CM Eknath Shinde : "निवडणूक होईपर्यंत महायुतीचा विजय असो" हीच आपली घोषणा राहणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी शायरी म्हणत विरोधकांवर टीका केली. "मैं एकेला ही चला था, लेकिन लोग मिलते चले और कारवा बनता गया," ही शायरी म्हणत मुख्यमंत्र्यांनी महायुतीबाबत उल्लेख केला. "दोन वर्षांपूर्वी जनामतासोबत झालेल्या विश्वासघाताचा बदला घेतला. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भक्कम साथ मला लाभली," असंही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपाचं कौतुक : "मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात भाजपाच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं आणि सहकार्य केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह चट्टान की तरह माझ्यासोबत उभे राहिले," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपाचं आणि मोदी-शाह यांचं कौतुक केलं. "महाविकास आघाडीच्या काळात सगळं बंद होतं फक्त फेसबुक सुरू होतं," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.
विधानसभा एकत्र लढवणार : "24 तास काम करणारं हे सरकार आहे. मी उशिरापर्यत काम करतो. देवेंद्र फडणवीस देखील उशिरापर्यंत काम करतात. तसंच अजित पवार देखील सकाळी लवकर उठून काम करतात. त्यामुळं पुढील काळात एकजूट दाखवण्याची गरज आहे, आगामी काळात महायुती म्हणून एकत्र काम करुन विधानसभा निवडणुका सोबत लढवणार," असा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
विरोधकांना संधी देणार नाही : "आगामी निवडणुकांसाठी महायुती म्हणून एकत्र काम करायचे आहे, कारण हे सरकार फक्त लोकांसाठी आहे. आमच्याविरोधात खोटी बातमी पसरवण्याची एकही संधी विरोधकांना देणार नाही," असं म्हणत "कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना आणि फायदे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी काम करा," असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिले.
हेही वाचा :