ETV Bharat / politics

एकनाथ खडसे करणार भाजपा प्रवेश; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगावचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. तशी चर्चा सातत्यानं होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Bawankule On Eknath Khadse
एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 4:03 PM IST

पुणे Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार गट ) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपामध्ये म्हणजेच घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, "पक्षामध्ये येण्याचं जर त्यांचं मत असेल, शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्ष प्रवेश करत आहोतच. पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही, म्हणत नाही. कारण शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आणि त्यासाठी येणारी जी काही नेते आहेत जसं की, अशोक चव्हाण, अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. जे जे पक्षामध्ये प्रवेश करतील, त्यांचा संघटना वाढवण्यामध्ये उपयोग आहे."

केंद्रीय आणि राज्य समिती विचार करेल : यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना एकनाथ खडसे हे भाजपात येत आहेत, पण त्यांची मुलगी येत नाही, याबाबत विचारलं. यावर ते म्हणाले की, "केंद्रीय आणि राज्य समिती याबाबत विचार करेल. कारण निर्णय संपूर्ण करावे लागतील. तुटक-तुटक निर्णय होणार नाही. राज्याची आणि केंद्राची समिती सगळ्या गोष्टीचा निर्णय करेल."

आमची कुणाचीही ना नाही : एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला अजून ग्रीन सिग्नल नाही का? यावर बावनकुळे म्हणाले की, "ग्रीन सिग्नलची गरजच नाही. शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वाला ज्यांना ज्यांना भाजपामध्ये यायचं असेल, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. आमच्या पक्षातून गेलेली लोकं असो किंवा काँग्रेसमधून येणारी लोकं असो. आजही पुण्यामध्ये काही पक्षप्रवेश झाले. त्यामुळं पक्ष प्रवेशासाठी आमची कुणाचीही ना नसते."

कुठलाही वाद नाही : एकनाथ खडसे यांचे अमित शाह आणि जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतल्याचं 15 दिवसापूर्वी फोटो आले आहेत, यावर समिती आता काय विचार करणार आहे का? याबाबत बावनकुळे म्हणाले की, "अमित शाह आणि जेपी नड्डा हे नेहमीच सर्वांना भेटतात. आम्हीही त्यांना रोज भेटतो. त्यामुळं कुठलाही वाद नाही, पण एक निर्णय प्रक्रिया आहे, या प्रक्रियेत जावं लागतं."

देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नाही : "देवेंद्र फडणवीस यांचा खडसे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध नाही. फडणवीस हे कधीही एकनाथ खडसे यांच्याविरोधात नाहीत. खडसे यांना सर्वात जास्त मानाचं स्थान फडणवीस यांनी पहिल्यापासून दिलं आहे. याचा मी साक्षीदार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातील एकनाथ खडसे यांचा सन्मान कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध कुणाशीही वाईट नाहीत."

हेही वाचा -

  1. एकनाथ खडसे करणार 'घरवापसी', खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत काय म्हणाले सत्ताधारी-विरोधक? - Eknath Khadse
  2. जागावाटपावरून शिवसेनेत कुरबुर; पाच जागांवर एक-दोन दिवसात तोडगा निघेल-संजय शिरसाट - Shivsena Meeting
  3. पक्षाच्या नावासह चिन्ह गमाविले! लोकसभा निवडणुकीत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंचा राजकीय अस्तित्वाकरिता संघर्ष - Maharashtra politics

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.