ETV Bharat / politics

चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री, 10 दिवसांत होणार फ्लोर टेस्ट - Champai Soren

Jharkhand CM : चंपाई सोरेन यांनी आज (2 फेब्रुवारी) झारखंडचे 12वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुरुवारी रात्री उशिरा राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केलं होतं.

Jharkhand CM Champai Soren
Jharkhand CM Champai Soren
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 7:44 AM IST

Updated : Feb 2, 2024, 12:32 PM IST

रांची Jharkhand CM : झारखंडमध्ये 31 जानेवारीच्या संध्याकाळपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आलंय. चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी झारखंडचे 12वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 1 फेब्रुवारीला दिवसभराच्या गदारोळानंतर रात्री उशिरा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी नवनियुक्त विधिमंडळ पक्षनेते चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं.

आज शपथविधी : गुरुवारी रात्री साडेदहा वाजता चंपाई सोरेन आणि आलमगीर आलम यांना राजभवनात बोलावण्यात आलं. राजभवनात पोहोचल्यानंतर रात्री 11.15 वाजता राज्यपालांनी चंपाई सोरेन यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीबाबतचं पत्र सुपूर्द केलं. आता राज्यपालांनी त्यांना 10 दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलंय.

9 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन : झारखंड विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंपाई सोरेन यांना 11 फेब्रुवारीपर्यंत बहुमत सिद्ध करावं लागेल. यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत रंजक ठरणार यात शंका नाही. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार चंपाई सोरेन यांच्या नावावर खूश नसल्याचा दावा प्रमुख विरोधी पक्ष भाजपा करत आहे. त्यामुळे फ्लोर टेस्टच्या दिवशी हे रहस्य उलगडणार आहे.

दिवसभर गोंधळाची स्थिती : गुरुवारी दिवसभर गोंधळाचं वातावरण होतं. सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार सर्किट हाऊसमध्ये राज्यपालांच्या निमंत्रणाची वाट पाहत बसले होते. दुपारपर्यंत कोणताही संदेश न मिळाल्यानं चंपाई सोरेन आणि आलमगीर आलम यांनी राजभवन गाठून शपथ घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. बाहेर आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी सांगितलं की, राज्यपालांनी या विषयावर कायदेतज्ज्ञांचे मत घेत असल्याचं सांगितलं असून उद्या आपला निर्णय कळवू.

आमदारांना हैदराबादला नेण्याची तयारी : राज्यपालांच्या या संदेशानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये कुजबूज सुरू झाली. यानंतर रांची विमानतळावर आधीच उपस्थित असलेल्या दोन चार्टर्ड विमानांनी सर्व आमदारांना हैदराबादला नेण्याची तयारी सुरू झाली. आमदार चार्टर्ड विमानात चढले देखील, मात्र खराब हवामानामुळे विमान रद्द करण्यात आलं. यानंतर झारखंडमध्ये काहीतरी मोठं घडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. मात्र संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट झालं.

हे वाचलंत का :

  1. कोण आहेत 'झारखंड टायगर' चंपाई सोरेन? हेमंत सोरेन यांच्या जागी बनणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

Last Updated : Feb 2, 2024, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.