ETV Bharat / politics

बेपत्ता झाल्याचे पोस्टर लागलेल्या 'या' अभिनेत्याचा पत्ता कट, भाजपाचा दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांवर विश्वास - BJP 8th Candidates List

author img

By ANI

Published : Mar 31, 2024, 7:44 AM IST

BJP 8th Candidates List : भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर केलीय. भाजपानं पंजाबमधील 6, ओडिशातील 3 आणि पश्चिम बंगालमधील 2 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना पक्षानं उमेदवारी दिलीय.

आठव्या यादीत भाजपाचं धक्कातंत्र; 'या' दिग्गज अभिनेत्याचा पत्ता कट तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी

नवी दिल्ली BJP 8th Candidates List : भारतीय जनता पक्षानं शनिवारी रात्री लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर केली. यात भाजपानं पंजाबमधील 6, ओडिशातील 3 आणि पश्चिम बंगालमधील 2 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले.

अभिनेता सनी देओलचा पत्ता कट : भाजपानं पुन्हा एकदा आपल्या धक्कात्रंताचा वापर करत पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून अभिनेता सनी देओलचा पत्ता कट केलाय. त्यांच्या जागी दिनेश सिंग 'बब्बू' यांना तिकीट देण्यात आलंय. सनी देओल हरविले आहेत, असे पोस्टर काही महिन्यांपूर्वी गुरुदासपूरमध्ये लागले होते. त्यामुळे लोकांच्या नाराजीची भाजपानं दखल घेतल्याची दिसत आहे. तर भाजपानं अमृतसरमधून तरनजीत सिंग संधू यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय. दुसरीकडे, पक्षानं परनीत कौर यांना पटियाला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. परनीत कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. तर फरीदकोटमधून भाजपानं गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिलीय. हंसराज हंस सध्या उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तसंच भाजपानं लुधियानामधून रवनीत सिंग बिट्टू आणि जालंधरमधून सुशील कुमार रिंकू यांना मैदानात उतरवलंय.

पंजाबमधील उमदेवारांची यादी
पंजाबमधील उमदेवारांची यादी

ओडिशातील तीन जागांवर कोण : भाजपानं ओडिशातील तीन जागांवरही आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली. यात जाजपूरमधून रवींद्र नारायण बेहरा, कंधमालमधून सुकांत कुमार पाणिग्रही आणि कटकमधून भर्त्रीहरी महताब यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपानं पश्चिम बंगालच्या झारग्राममधून प्रणत तुडू आणि बीरभूममधून आयपीएस देवाशिष धर यांना तिकीट दिलंय.

दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांवर विश्वास : भाजपानं आम आदमी पक्षातून भाजपात आलेले सुशील कुमार रिंकू आणि काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रवनीत सिंह बिट्टू आणि परनीत कौर यांना तिकीट दिलंय. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचा नातू रवनीत बिट्टू यांनी नुकताच काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला होता. रवनीत बिट्टू सध्या लुधियानाचे खासदार आहेत. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. विशेष म्हणजे बिट्टू यांनी 26 मार्च रोजी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

पतियाळा येथून परनीत कौर यांना तिकीट : भाजपानं पटियालामधून परनीत कौर यांना तिकीट दिलंय. परनीत यांनीही या महिन्यात काँग्रेस सोडत भाजपामध्ये प्रवेश केला. आता भाजपानं लगेच त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. तसंच जालंधरचे खासदार सुशील कुमार रिंकू यांनीही अलीकडेच आम आदमी पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला होता. आम आदमी पार्टीनं आपल्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. रिंकू यांना जालंधरमधून पुन्हा तिकीट देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी आप सोडून भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

  1. बारामतीचं ठरलं! नणंद विरुद्ध भावजय लढत, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर - Supriya VS Sunetra
  2. राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा रासपला - तटकरे - NCP State President Sunil Tatkare

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.