ETV Bharat / politics

लोकसभा निवडणुकीपूर्वी गौतमनं घेतला 'गंभीर' निर्णय; सोशल मीडियावर केली घोषणा - भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा

MP Gautam Gambhir : भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं राजकारणातून निवृत्ती जाहीर केलीय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यानं याची माहिती दिलीय.

लोकसभा निवडणुकीपूर्वी गौतमनं घेतला 'गंभीर' निर्णय; सोशल मीडियावर केली घोषणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 1:23 PM IST

Updated : Mar 2, 2024, 2:52 PM IST

नवी दिल्ली MP Gautam Gambhir : भारतीय जनता पार्टीचा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानं स्वतः 'X' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करत ही माहिती दिली. क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचं कारण देत राजकारणापासून लांब रहात असल्याचं कारण गौतमने दिलं असलं तरी येत्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात कमी असल्याचं लक्षात घेत गौतम गंभीरनं हा 'गंभीर' निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गंभीर हा पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा खासदार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून तो पहिल्यांदाच संसदेत पोहोचला होता.

काय म्हणाला गौतम गंभीर : गौतमनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "मी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याचं आवाहन करतो, जेणेकरुन मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करु शकेल. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद." आता अशा परिस्थितीत भाजपा पूर्व दिल्लीतून कोणत्या उमेदवाराला तिकीट देतं हे पहावं लागेल.

2019 मध्ये केला भाजपात प्रवेश : गौतम गंभीरनं 2019 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मार्च 2019 मध्ये त्यानं भाजपामध्ये प्रवेश केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची नावं जाहीर केली तेव्हा गंभीरला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे त्यानं या जागेवरुन विजयही मिळवला होता. त्याच्यासमोर आम आदमी पक्षाच्या आतिशी मार्लेना आणि काँग्रेसचे अरविंदर सिंग लवली हे रिंगणात होते.

निर्णयामागं कारण काय : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गौतमच्या राजकीय निवृत्तीच्या बातमीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. लोकसभेत जाण्यासाठी अनेक नेत्यांनी 'फिल्डींग' लावलेली असताना गौतम गंभीरसारख्या गेम प्लानिंगमध्ये कुशल असलेल्या व्यक्तीने तिकीट का नाकारलं असावं, हा तर्क लढवला जातोय. कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळं गौतम गंभीरचं तिकीट कापलं जाऊ शकतं, अशी जोरदार चर्चाही होती. त्याचवेळी विरोधी पक्षातील राजकारणीही त्याला तिकीट न देण्याबाबत सातत्यानं बोलत होते.

हेही वाचा :

  1. 'तीन दिवसात माफी मागा'; नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस, काय आहे प्रकरण?
  2. गौतम गंभीरची मोठी भविष्यवाणी; 'हा' संघ टी २० विश्वचषकात भारतासाठी धोका असल्याचं म्हणाला

Last Updated : Mar 2, 2024, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.