ETV Bharat / politics

सावंतवाडीमुळं महायुतीत ठिणगी? भाजपाच्या राजन तेली आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यात 'जुंपली' - Sawantwadi Constituency

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 5:44 PM IST

Sawantwadi Constituency : लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गात भाजपाला मिळालेल्या यशानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर आता भाजपानं दावा केल्याचं पाहायला मिळतय. भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक पत्र लिहिलं आहे.

Sawantwadi Constituency
सावंतवाडीमुळं महायुतीत ठिणगी (ETV Bharat File Photo)

सिंधुदुर्ग Sawantwadi Constituency : कोकणातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन महायुतीमध्ये वाद सुरू आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी दावा केला आहे. याला शिवसेनेचे मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिक्षणमंत्री दीपक केसकर (ETV Bharat Reporter)

कार्यकर्तांना उद्देशून लिहिलं पत्र : लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गात भाजपाला मिळालेल्या यशानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर आता भाजपानं दावा केल्याचं पाहायला मिळतय. भाजपाचे माजी आमदार आणि सावंतवाडी मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक पत्र लिहलं असून या पत्रातून त्यांनी शिवसेना आमदार तथा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आव्हान दिलं आहे. 15 वर्षांपासून दीपक केसरकर या मतदारसंघाचे आमदार तर गेल्या 8 वर्षांपासून मंत्री असूनही या मतदारसंघात काही करु शकले नाहीत. विकास करण्यात दीपक केसरकर सपशेल अपयशी ठरले आहेत, असं म्हणत तेली यांनी थेट केसरकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. इतकंच नव्हे तर तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघात भाजपाच्या कमळ निशाणीवर लढू या, असं थेट आवाहनच कार्यकर्त्यांना केलं आहे. विशेष म्हणजे राजन तेली यांनी दोनवेळा सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. त्यातच आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा भाजपाला मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी सावंतवाडी मतदारसंघावर भाजपाचं वर्चस्व कसं आहे आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचं प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य कसं कमी झालं, याकडं महायुतीच्या नेत्यांचं लक्ष वेधल्याचं पाहायला मिळतय.

केसरकरांची सावध प्रतिक्रिया : या वादावर आमदार दीपक केसरकर यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. अनेकांना आमदार बनण्याची इच्छा असते. इच्छा असणे यात वाईट काही नाही. परंतु, महायुतीचा धर्म आहे. महायुती ज्याला उमेदवारी देईल, त्याचा प्रचार करावा लागेल. आम्ही करणार नाही, ही भाषा राजन तेलींनी बदलावी. त्यांची जर अगोदरच इच्छा असेल की दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवायची, तर तो निर्णय तेली यांनी आधीच घेतला पाहिजे. एक इच्छुक उमेदवार महायुतीत मिठाचा खडा टाकत असेल तर कोणताही पक्ष सहन करणार नाही. मी याबाबत वरिष्ठांशी बोललोय, असं दीपक केसरकर म्हणाले.

महायुतीत वादाची ठिणगी : सध्या सावंतवाडी मतदारसंघ हा शिवसेनेकडे (शिंदे गट) आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसकर हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, भाजपाचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष राजन तेली यांनी केसरकर यांना थेट विरोधच केला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी या मतदारसंघात कमळ चिन्हाच्या निशाणीवर लढण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं महायुतीमधील शिंदे गट आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रात महायुतीला एक्केचाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील - दीपक केसरकर - Deepak Kesarkar Claims
  2. उद्धव ठाकरेंना भगवा ध्वज हातात...; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला - lok sabha election

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.