मुंबई/पालघर Lok Sabha Election 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपानं हेमंत विष्णू सावरा यांना तिकीट दिलंय. ते भाजपाचे दिवंगत नेते विष्णु सावरा यांचे पुत्र आहेत. पालघरच्या जागेचा मुद्दा भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अडकला होता. अखेर ही जागा आपल्याकडं आणण्यात भाजपाला यश आलंय. मोठी बाब म्हणजे या जागेवरुन शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार आहेत. त्यांचा पत्ता कट करण्यात आलाय.
महायुतीत सुरू होती रस्सीखेच : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पालघर जागेच्या वाटणीमध्ये महायुतीमध्ये चढाओढ सुरू होती. ठाण्याची जागा शिवसेनेकडं गेली होती. त्यानंतर पालघरचा उमेदवार भाजपा ठरवेल हे जवळपास निश्चित झालं होतं. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये विशेष स्पर्धा नसताना देखील महायुतीतर्फे पालघर लोकसभेची उमेदवारी सर्वात अखेरीस घोषित करण्यात आली.
ठाकरे गटाच्या भारती कदम यांच्याशी होणार सामना : पालघरच्या जागेवरुन हेमंत सावरा यांना तिकीट द्यावं, अशी मागणी भाजपाचे कार्यकर्ते करत होते आणि त्यामुळंच त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षानं घेतलाय, अशी चर्चा आहे. या जागेवर हेमंत सावरा यांची लढत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कदम यांच्याशी होणार आहे.
हेही वाचा :
- 'ईटीव्ही भारत'च्या उलटतपासणीला उज्वल निकम यांनी दिली मनसोक्त उत्तरं; पाहा खास मुलाखत - Ujjwal Nikam Interview
- उमेदवारी जाहीर होताच महायुतीचे नेते 'राज'दरबारी, काय आहे भेटीचं गणित? - Lok Sabha Election 2024
- राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघ ठरवणार खरी शिवसेना कोणाची? 'या' मतदारसंघात दोन शिवसैनिक आमनेसामने - shivsena against shivsena