ETV Bharat / politics

पीएम फंडाची माहिती देत नाही, मग भाजपा देणग्या का मागते; कॉंग्रेसचा सवाल - BJP Donation

BJP Donation : सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपा देणगी गोळा करत आहे. विशेषतः त्यासाठी आमदार, पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावरुन थेट संदेश पाठवले जात असून किमान पाच रुपयांपासून देणगी घेतली जात आहे. यावरुन कॉंग्रेसनं भाजपावर टीका केलीय.

BJP Donation
पीएम फंडाची माहिती देत नाही, मग भाजपा देणग्या का मागते; कॉंग्रेसचा सवाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 9:26 AM IST

राजेंद्र बागुल

नाशिक BJP Donation : राजकीय पक्षांना देणग्या देण्याची पूर्वपार परंपरा आहे. अलीकडंच इलेक्ट्रॉल बॉण्ड ही नवीन पद्धत सुरु झाली असली तरी तिला सर्वोच्च न्यायालयानं चाप लावला. एकाच पक्षाला मोठ्या प्रमाणात देणगी मिळाली असली, तरी त्याच पक्षाच्या आमदारांकडून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षासाठी देणगी गोळा केली जात आहे. विशेषतः त्यासाठी आमदार, पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावरुन थेट संदेश पाठवले जात आहेत. किमान पाच रुपयांपासून देणगी घेतली जात आहे. एकीकडं पीएम फंडात किती पैसे जमा झाले, याची माहिती देण्यासाठी भाजपा उत्सुक नसताना, दुसरीकडं सर्वसामान्य जनता महागाई होरपळत असताना देणग्या का मागतात, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.

भाजपाच्या वर्गणीला कॉंग्रेसचा आक्षेप : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झालीय. लोकसभेसाठी काही पक्षांनी उमेदवारी जाहीर केली, तर काही पक्षांचा घोळ अद्यापही सुरु आहे. त्यातच राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशात निवडणूक म्हटलं की आर्थिक खर्च आलाच आणि यासाठी काही धनाढ्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांना खर्चासाठी देणग्या मिळतात. या देणगीतूनच पक्षाचा खर्च चालतो, असं असलं तरी सध्या सत्तेत असलेल्या शहरातील भाजपा आमदारांनी सोशल मीडियावरुन एक संदेश व्हायरल करत विकसित भारतच्या अभूतपूर्व विकासाला चालना देण्यासाठी देणगी देण्याचं आवाहन केलंय. त्याखाली एक लिंक शेअर करण्यात आलीय. त्यावर क्लिक केल्यावर नमो ॲप ओपन होतं आणि त्यावर पाच रुपयांपासून देणगी देण्याची सुविधा आहे. जास्तीत जास्त कितीही देणगी देता येणार आहेत. शहरातील एका विशिष्ट पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून असे संदेश मोबाईलच्या माध्यमातून नागरिकांच्या व्हाट्सअपवर वायरल करण्यात आले आहेत. ही बाब शहरवासीयांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे, तर दुसरीकडं विरोधात असलेल्या काँग्रेसनं यावर आक्षेप घेतलाय.

पीएम फंडाची माहिती लपवणारे आता पाच, पाच रुपये मागत आहेत : "भाजपा म्हणजे जुमला पार्टी आहे. लुटमार, खोटारडेपणा आणि भ्रष्टाचारांना पाठीशी घालत, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी परिस्थिती आहे. कोरोना काळात पीएम फंडाच्या माध्यमातून अब्जावधींची लूट भाजपानं केली, ना त्याचा हिशोब दिला ना माहिती दिली. हिंदु राष्ट्राची घोषणा करणारे गोवंश हत्या प्रकरणी मोठं गारुड देशभर करणारे, आज इलेक्ट्रॉल बॉण्डच्या नावानं करोडो रुपये यांना मिळाले, हे सुप्रीम कोर्टानं लोकांच्या समोर आणून दिलं. दुसरीकडं महागाईनं, बेरोजगारींनी लोक त्रस्त झाली आहेत. अशात पाच पाच रुपये तुम्ही जनतेकडून मागत आहात, काय कमी आहे? भाजपाचा हा खोटे पणा जास्त दिवस आता टिकणार नाही," असं कॉग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी राजेंद्र बागुल यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ, शिंदे, पवार, शाहंचीही होणार जाहीर सभा - Lok Sabha Elections 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.