ETV Bharat / politics

रुसलेले शिंदे हसले, तरी भाजपामध्ये अजूनही फसलेले; एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय? - MAHAYUTI CABINET EXPANSION

विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत उत्सुकता आहे.

MAHAYUTI CABINET EXPANSION
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2024, 6:20 PM IST

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी शिवसेना आणि भाजपामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. महत्त्वाच्या खात्यावरून दोन्ही पक्षात अंतर्गत आग अजूनही धुमसत आहे. जोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, तोपर्यंत ही आग धुमसतचं राहणार. गृहमंत्री, नगर विकास या खात्यांसह सभापती पदाची मागणी सुद्धा एकनाथ शिंदेकडून होत आहे. भाजपाला एकनाथ शिंदे यांच्या या मागण्या पूर्ण करणं शक्य नसल्यानं अंतर्गत धुमसत असलेल्या आगीचा वणवा येत्या दिवसात भडकू शकतो.

वणवा पेटतच राहणार : भाजपाला सर्वाधिक जागा मिळून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित करायला 10 दिवसांचा कालावधी लागला. यादरम्यान मुंबईपासून दिल्लीपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. यानंतरही उपमुख्यमंत्री पदाबाबतही तोच सिलसिला कायम राहिला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नव्हते. ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी निवडणुकी निकालानंतर लगेचच भाजपाच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा दिला, त्यावरून ते उपमुख्यमंत्री पद घेणार हे निश्चित झालं होतं. परंतु एकनाथ शिंदे यांचं तसं नव्हतं. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार? की त्यांच्या पक्षाकडून आणखी कोणाला संधी देणार? याबाबत चर्चा ताणल्या गेल्या होत्या. अखेर अनेक विनंत्या करून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला तयार झाले. परंतु एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असलं, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत हा वणवा पेटतच राहणार आहे.

एकनाथ शिंदे यांची कोंडी : विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीचा जनादेश जनतेनं दिला, ते पाहता राज्यात भाजपा सर्वात मोठा ठरला आहे. त्यांना 132 जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल शिवसेनेनं 57 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 41 जागांवर विजय संपादित केला. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी राहतील, हे तेव्हाच निश्चित झालं होतं. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यास दुजोरा दिला होता. परंतु देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खात होतं, त्याप्रमाणे आपणाला गृह खातं मिळेल, अशी पूर्ण खात्री एकनाथ शिंदे यांना होती. पण ते देण्यास भाजपानं नकार दिल्यावर एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी गृह खात्यासाठी आग्रही आणि अडवणुकीची भूमिका घेतल्यावर भाजपा त्यांना गृह खातं देण्यास तयार झाला असून त्या बदल्यात त्यांनी नगर विकास खातं भाजपाला सोडावं, अशी अट घातल्याची माहिती समोर आली आहे. या कारणानं आता चहूबाजूंनी एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे.

अनेक नेत्यांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ : विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 7 डिसेंबर ते 9 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. यादरम्यान सर्व आमदारांचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्यपालांचं अभिभाषण असा हा कार्यक्रम असणार आहे. तरीसुद्धा यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटपाबाबत चर्चेचं गुऱ्हाळ रंगणार आहे. मुख्यमंत्री यांच्या शपथविधी प्रसंगी शिवसेनेच्या नेत्यांना मुख्य मंचापासून दूर ठेवण्यात आलं होतं. शिंदे परिवारातील अनेक सदस्यांना आत प्रवेशही नाकारण्यात आला. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव चिखलीकर सोडले, तर एकही नेता मुख्य मंचावर नव्हता. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे नेते मुख्य मंचावर होते. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. या सर्व बाबी बघता भाजपा आणि शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र दर्शवत.

आता शिंदेंचा हट्टीपणा नको : जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलताना राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणाले, "प्रथेप्रमाणे सर्वात अगोदर आमदारांचा शपथविधी होणार आहे. या दरम्यानच्या कालावधीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खाते वाटपासाठी वाटाघाटी करायला अवधी मिळणार आहे. मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याच्या दिवशी ज्या पद्धतीनं अखेरच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबाबत ताणून धरलं त्याचा योग्य तो संदेश भाजपा पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गृह खात्यावर अडून बसले, तर त्यांना नगर विकास खात्यावर पाणी सोडावं लागणार आहे. भाजपा कुठल्याही परिस्थितीत गृह आणि नगर विकास ही दोन्ही खाती एकनाथ शिंदे यांना देणार नाही. एकनाथ शिंदे यांनी सभापती पदाचाही आग्रह धरल्याची माहिती आहे. परंतु हे पद सुद्धा इतक्या सहजासहजी भाजपा एकनाथ शिंदेंना देणार नाही. एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांना भाजपा सांगेल त्याप्रमाणे वागावं लागणार आहे. त्यांनी खाते वाटपाबाबत जास्त ताणून धरल्यास ते त्यांच्या पक्षासाठीच घातक ठरणार."

हेही वाचा

  1. एकनाथ शिंदे अजूनही नाराज? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं
  2. ईव्हीएममध्ये घोळ आहे की नाही? निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं
  3. शासकीय बंगल्याची अदलाबदल; रामगिरीबाहेर देवेंद्र फडणवीसांच्या, तर देवगिरीबाहेर एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.