ETV Bharat / politics

बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार राहणार की NDA पुन्हा येणार सत्तेत, जाणून घ्या विधानसभेचं गणित

Bihar Politics : बिहारच्या राजकारणातील गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपा, जदयू आणि राजद तोडफोडीच्या राजकारणात गुंतले आहेत. अशा परिस्थितीत बिहार विधानसभेचं सध्याचे आणि बदलानंतरचं चित्र काय असेल? सविस्तर जाणून घ्या.

Bihar Politics
Bihar Politics
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 9:57 PM IST

पाटणा Bihar Politics : पंतप्रधान मोदींविरोधात देशभरातील भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करणारे आणि 'इंडिया' आघाडीचे शिल्पकार असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएकडे झुकताना दिसतायेत. नितीश कुमार यांच्यावर दबावाचं राजकारण केल्याचा आरोप आहे. यावेळी नितीश यांच्या राजकारणानं आणखी एक पातळी ओलांडली.

बिहारमध्ये मोठा 'गेम' होणार? : दबावाच्या राजकारणाद्वारे आपली मागणी पूर्ण करवून घेण्यात नितीश कुमार माहिर आहेत. सध्या बिहारमधील राजकीय गदारोळामुळे, त्यांना जे साध्य करायचं होतं ते साध्य झाल्याचं दिसतंय. अशा स्थितीत, महाआघाडीतील दोन प्रमुख पक्ष आरजेडी आणि जेडीयूमधील भांडणंही चव्हाट्यावर आलीत. जदयू नेते मनोज झा यांनी नितीश कुमारांकडे स्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

येथून राजकीय वातावरण बदललं : कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त नितीश कुमार यांनी कुटुंबवादाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर एनडीएच्या अनेक नेत्यांनी हा मुद्दा जोरात मांडण्यास सुरुवात केली. घराणेशाहीबाबत भाजपा लालू, काँग्रेस तसेच सपाला सतत टोलावत असतो.

बिहार विधानसभेची सद्यस्थिती : 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. मात्र 7 ऑगस्ट 2022 रोजी नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत सरकार स्थापन केलं. महाआघाडीला 160 आमदारांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही. यावेळी नितीश कुमार यांनी पुन्हा पक्ष बदलून एनडीएसोबत सरकार स्थापन केलं तरी बहुमताचा आकडा फार वाढणार नाही.

2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गणित बदललं : बिहारमध्ये सध्या आरजेडीचे 79 आमदार आहेत. तर जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19 आणि डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत. जेडीयूला एका अपक्ष आमदाराचाही पाठिंबा आहे. म्हणजेच सध्या एकूण 160 आमदार महाआघाडीसोबत आहेत. यासोबतच एआयएमआयएमचा एक आमदारही त्यांच्यासोबत आहे. तसं पाहिलं तर, एआयएमआयएमचे पाच आमदार विजयी झाले होते. परंतु त्यापैकी चार आरजेडीमध्ये सामील झाले. त्यामुळे आता केवळ एक आमदार एआयएमआयएमकडे उरला आहे.

नितीश कुमारांच्या पलटी नंतरचं गणित : दुसरीकडे, एनडीएबाबत बोलायचं झालं तर भाजपाचे 78 आमदार आहेत. तर जितनराम मांझी यांच्या 'हम' पक्षाला केवळ चार आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र नितीशकुमार यांनी पलटी मारताच, त्यांच्या 45 आणि एका अपक्ष आमदाराच्या पाठिंब्यानं ही संख्या 128 वर जाईल. बहुमताचा आकडा 122 आहे.

लालू सक्रिय झाले : ही बहुमताची संख्या येथे फारशी नाही. त्यामुळे बिहारच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलंय. गेल्या काही काळापासून सक्रिय नसलेले लालू प्रसाद यादव पुन्हा सक्रिय झाले आहेत. लालू प्रसाद यादव हे जितनराम मांझी यांच्याशी बोलून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच ते जेडीयूच्या नाराज आमदारांनाही त्यांच्या बाजूनं आणण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत नितीश कुमारांच्या अडचणी वाढू शकतात.

नितीश ही पावलं उचलू शकतात : मुख्यमंत्री नितिश कुमार आरजेडीच्या मंत्र्यांना बडतर्फ करून भाजपासह एचएएमच्या पाठिंब्यानं सरकार चालवू शकतात. तसेच मंत्रिमंडळाचाही विस्तार करू शकतो. कारण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास आरजेडी सरकार स्थापनेचा दावा करू शकतं. कारण सध्या राजद हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमार धोका पत्करणार नाहीत.

नितीश कुमार विधानसभा विसर्जित करू शकतात का? : दुसरं म्हणजे नितीश कुमार विधानसभा बरखास्तही करू शकतात, मात्र भाजपा यासाठी तयार दिसत नाही. अशा परिस्थितीत, फक्त पहिला पर्याय सोईचा मानला जातोय. कारण नितीश कुमार यांचा भाजपासोबतचा करार झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये सरकार बदलणं निश्चित आहे.

हे वाचलंत का :

  1. भाजपा नेत्यांचे सूर बदलले, तेजस्वी यादवही सावध; बिहारमध्ये 'गेम' नक्की होणार!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.