सातारा Lok Sabha Election 2024 : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) नेहमीप्रमाणं सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. १९ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. छ. शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आहे. त्यासाठी सातारकरांनी मला संधी द्यावी, असं आवाहन बिचुकलेंनी केलंय.
छत्रपतींच्या वंशजांचा मान राखला का : भाजपाकडून तिकीट मिळावं ही आमच्या उदयनदादांची इच्छा होती. पण, भाजपानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा किती मान राखला, याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला अभिजित बिचुकलेंनी उदयनराजेंना दिलाय. मी कोणत्याही परिस्थितीत १९ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे. छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आहे. देशाला नवी दिशा द्यायची आहे, असंही बिचुकलेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
शक्ती युध्दात दाखवायची असते : शक्ती ही युध्दात दाखवायची असते. दोन रुपयांची दारू पाजून, मटणं देऊन दाखवायची नसते, अशा शब्दांत शक्तिप्रदर्शनावरून बिचुकलेंनी राजकारण्यांना फटकारलं आहे. शरद पवार आणि उदयनराजे यांचं हाडवैर आहे. पवारांनी उदयनराजे, भाऊसाहेब महाराज (अभयसिंहराजे भोसले) यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं छत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून जनतेने माझ्या पाठिशी राहावं, असं आवाहन बिचुकलेंनी केलंय.
कोण आहेत अभिजित बिचुकले? : अभिजित बिचुकले हे बिग बॉस सीझन १५ चे स्पर्धक होते. वाईल्ड कार्डद्वारे त्यांना शो मध्ये प्रवेश मिळाला होता. ते बिग बॉस मराठीच्या सीझन २ मध्येही होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार होते. कसबा पोटनिवडणुकही ते लढले होते. चेक बाऊन्स प्रकरणी सातारा क्राईम ब्रँचनं लोणावळ्यात बिग बॉस मराठी शोच्या सेटवर त्यांना अटक केली होती. गल्ली झाडायला शंभर सलमान दारात उभे करेन, स्वतःचा पक्ष काढणार, अशा वल्गनाही बिचुकलेंनी केल्या होत्या. दरम्यान, साताऱ्यात मी फक्त ए. बी. ला घाबरतो, असं खासदार उदयनराजे भोसले गमतीनं म्हणतात.
हेही वाचा -
- वर्धा लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी; रामदास तडस की अमर काळे? - Lok Sabha Election 2024
- मोदींची हवा, कुठे नरम, कुठे गरम; विरोधकांनी दिली खरमरीत प्रतिक्रिया तर महायुतीला दिसतोय मोदींचा करिश्मा - Lok Sabha Election 2024
- 'मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा'; कट्टर राजकीय विरोधक अडसूळ-राणा एकत्र, अनेक वर्षांचं शत्रुत्व संपलं - Lok Sabha Election 2024