ETV Bharat / politics

राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या वादाचा पवार कुटुंबावर परिणाम, बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काय वाद झाला? - Baramati lok Sabha election 2024 - BARAMATI LOK SABHA ELECTION 2024

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या दिवशी बारामतीत राजकीय वातावरण चांगलंय तापलं. अजित पवार गटाकडून पैसे वाटप, मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. दुसरीकडं खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी दिलेल्या भेटीवरुनही राजकारण झालं. बारामती लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी झालेले वाद आणि कोणत्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले, याबाबत सविस्तर माहिती वाचा.

Baramati lok Sabha election 2024
Baramati lok Sabha election 2024 (Source- ETV Bharat GFX)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 10:45 AM IST

Updated : May 8, 2024, 12:34 PM IST

बारामती (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या आई आशाताई पवार यांना मतदानासाठी आणलं. त्यावरून त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी "या वयात आईला राजकारणात कशाला आणता," असा खोचक सवाल दादांना केला. त्या संदर्भात माध्यमांनी मंगळवारी प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सुनावलं. एका माध्यम प्रतिनिधीनं चुकून आपले मोठे बंधू असा उल्लेख केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले. अजित पवारांनी माहिती घेऊन प्रश्न विचारत जा, असंदेखील माध्यम प्रतिनिधींना सुनावलं.

मंगळवारी सकाळी अजित पवार हे सुनेत्रा पवार यांच्यासह आशाताई पवारांना घेऊन मतदानासाठी काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आले होते. तेव्हा बोलताना त्यांनी 'दीवार' या हिंदी चित्रपटातील "मेरे पास मेरी माँ है" हा डायलॉग ऐकवला. त्यावरून अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार संतापले. श्रीनिवास पवारांनी पत्रकारांबरोबर संवाद साधताना अजित पवारांवर टीका केली. त्यानंतर दुपारच्या वेळी अजित पवारांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा माध्यमांनी साहजिकच हाच प्रश्न अजित पवारांना विचारला. अजित पवारांना हा प्रश्न आवडला नसावा. मात्र चुकून 'मोठे बंधू' असा उल्लेख होताच अजित पवार खवळले. त्यांनी माध्यम प्रतिनिधीला फैलावर घेतलं. "माहिती घेत नाही. माहिती नसते. काहीही विचारता आणि पुन्हा मी बोलल्यानंतर अजित पवार बोलतो, असं म्हणता." असे म्हणत त्यांनी श्रीनिवास पवार हा माझा धाकटा भाऊ असून त्याच्यापेक्षा मी तीन वर्षांनी मोठा आहे, अशी माहिती दिली. एवढ्यावर न थांबता त्यांनी पुन्हा कुटुंबाचा इतिहास उघडला.

"मला कुटुंबाचा पंचनामा करायचा नाही. पण आई आजारी असताना तिची सर्वाधिक काळजी घेतली. त्यावेळी हे विचारणारे जे कोणी आहेत, ते कोठेही तेथे नव्हते. कालही आई माझ्याबरोबर होती, आजही माझ्याबरोबर आहे आणि उद्याही माझ्याबरोबर असेल." उपमुख्यमंत्री अजित पवार

अजित पवार यांच्याकडून आमदार दत्तात्रय भरणे यांची पाठराखण - उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "आमदार दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ पाहिला आहे. त्यानंतर दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रियादेखील ऐकली आहे. दत्तात्रय भरणे त्या ठिकाणी राऊंडला गेले होते. या ठिकाणी काहीतरी किरकोळ वाद सुरू होता. येथील व्यक्तीला मारहाण झाली असती. असे काही होऊ नये यासाठी त्यांनी तिथे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. भरणे म्हणाले, मी याबद्दल कोणतीही पोलीस तक्रार देणार नाही. दत्ता भरणे यांनी सांगितले, मी तिथे गेलो नसतो हस्तक्षेप केला नसता तर नक्कीच काहीतरी वेगळे घडले असते. विरोधकांनी बहुधा पोलीस तक्रार दाखल केली आहे. मला त्याला उत्तर द्यायचे असेल तर वकिलाच्यामार्फत देईल असे दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत."

राजकीय पक्षांनी लक्ष देणं गरजेचं- पुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले, " मी काही ठिकाणी पाहिलं आहे. धाराशिवमध्ये चाकूनं एक जणाला भोसकलं आहे. मतदारादरम्यान एका ठिकाणी एक व्यक्ती दगावलीदेखील आहे. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला शोभणाऱ्या नाहीत. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मी जवळपास 35 वर्षे निवडणुका लढवत आहे. या काळात कधीही असले प्रकार मी पाहिले नाहीत."

खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी भेट दिली. त्यावर माध्यमांनी विचारताच अजित पवार म्हणाले," त्या आलेल्या मला माहित नाही. असे कोणी भेटून गेलं म्हणून त्यावर बारामतीचा मतदार मतदान करत नाही. ते फार विचारांती मतदान करतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बारामतीकर त्यांच्या विवेकबुद्धीला अनुसरून मतदान करतील, असं मला वाटतं."

हेही वाचा-

  1. बारामतीत काट्याची टक्कर? सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांच्या लढतीत अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला - Lok Sabah Election 2024
  2. मडकं फोडतात विरोधक, मात्र फायदा होतो शरद पवारांनाच! विरोधकांनी मडकं फोडून जनतेत निर्माण केलाय असंतोष - Lok sabha election 2024
  3. "त्यांना ताठ मानेनं किमान ५० पावलं चालण्याची शक्ती लाभो..." शरद पवारांच्या प्रकृतीवरून टिंगल करणाऱ्यांना प्रशांत जगतापांचा टोला - sharad pawar

Last Updated : May 8, 2024, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.