ETV Bharat / politics

खैरेंसारखा उमेदवार म्हणजे दुर्दैव, जुन्या शिवसैनिकानं व्यक्त केली भावना - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS

Lok Sabha Elections : ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र खैरे (Chandrakant Khaire) यांचे नाव चर्चेत येताच मराठवाड्याचे वाटोळे करणाऱ्याला उमेदवारी कशाला असा प्रश्न, शिवसेनेचे पाहिले जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील (Subhash Patil) यांनी उपस्थित केलाय.

Subhash Patil And Ambadas Danve
सुभाष पाटील आणि अंबादास दानवे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 10:41 PM IST

प्रतिक्रिया देताना भाजपा नेते सुभाष पाटील

छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजलं असून औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे. त्यात ठाकरे गटाने अद्याप उमेदवारी कोणालाही जाहीर केली नसली तरी, संभ्याव्य उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचं नाव समोर येताच, आजी माजी नेत्यांनी हा उमेदवार नको अशी भूमिका घेतली आहे.

खैरे यांच्यासमोर मोठ आव्हान : शिवसेनेचे जिल्ह्याचे पहिले जिल्हाध्यक्ष आणि भाजपाचे विद्यमान नेते सुभाष पाटील (Subhash Patil) यांनी जोरदार टीका केली आहे. खैरेंना पाडण्यासाठी मी पण निवडणूक लढवू शकतो असा इशारा, त्यांनी दिलाय. तर दुसरीकडं ठाकरे गटाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उमेदवार बदलण्याची मागणी पक्षाकडं केली असल्यानं खैरे यांच्यासमोर मोठ आव्हान निर्माण झालं आहे.

जुन्या शिवसैनिकाचे आव्हान : सुभाष पाटील सध्या भाजपाचे कार्यकारणी सदस्य असून १९९० पासून जिल्ह्यात शिवसेनेच्या बांधणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. कालांतराने खैरे आमदार झाले आणि सुभाष पाटील मागे पडले. खैरे यांनी संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याचे खूप मोठे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केलाय. जर खैरे यांचा सारखा उमेदवार पुन्हा निवडणूक लढणार असेल तर मी पण लोकसभा लढवू शकतो. असा उमेदवार जो आपल्या भागाला मागे टाकेल, नुकसान करेल या उमेदवाराला मतदार मान्य करणार नाही. खैरे यांना उमेदवारी दिल्यास भाजपा त्यांचा पराभव करु शकते. तशी तयारी पक्ष करत आहेत. त्यामुळं जुने शिवसैनिक खैरे यांच्या कामकाजाबाबत समाधानी नसल्याचं पाहायला मिळतंय.

दानवे यांनी केली मागणी : २०१९ लोकसभा निवडणुकीपासून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पक्षाकडं लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मागितली होती. यंदा देखील त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानं खैरे यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. खैरे दानवे यांच्यातील शीतयुद्ध उघडपणं सुरू झाल्यानं दोनही नेत्यांना पक्ष प्रमुखांना मातोश्रीवर बोलावून समज दिली.

उमेदवारी मिळवण्याचा मार्ग कठीण : मातोश्रीवर समज दिल्यावर उघडपणे दोनही नेत्यांनी बोलणं टाळलं असलं तरी, दानवे यांनी उमेदवार जाहीर होऊ पर्यंत माघार नाही, तो पर्यंत मी उमेदवारी म्हणून इच्छुक असणार असं दानवे यांनी सांगितल्यानं अद्याप खैरे यांचा उमेदवारी मिळवण्याचा मार्ग कठीण असल्याचं बोललं जातय. तर औरंगाबाद लोकसभा मतदार चौथ्या टप्प्यात असल्यानं उमेदवाराची घोषणा लवकर होणार नाही, असं देखील बोललं जात असल्यानं खैरे आता देव पाण्यात ठेवून आहेत.

हेही वाचा -

  1. प्रकाश आंबेडकरांचा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न फसणार? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत - PRAKASH AMBEDKAR
  2. राजकीय नेत्यांची धुळवड! मुख्यमंत्री शिंदे नातवासोबत रंगले धुळवडीच्या रंगात, तर जितेंद्र आव्हाडांनी पारंपरिक पद्धतीनं केली होळी साजरी - Holi 2024
  3. राज्यात भाजपाचे 23 उमेदवार घोषित; शिंदे गट-अजित पवार गट नाराज? घोडं आडलंय कुठं? - Lok Sabha elections

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.