ETV Bharat / politics

गुरुनं शिष्यावर फोडलं पराभवाचं खापर; उद्धव ठाकरेंकडे करणार शिष्याची तक्रार - Lok Sabha Result - LOK SABHA RESULT

Chandrakant Khaire : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे मंत्री संदीपान भूमरे निवडून आले आहेत. यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पराभवाचं खापर अंबादास दानवेंवर फोडलंय.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 10:31 PM IST

छत्रपती संभाजीनगर Chandrakant Khaire : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा ठाकरे गटानं हक्काची जागा गमावली. माजी खासदार तथा नेते चंद्रकांत खैरे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा तब्बल एक लाख मत खैरेंना कमी पडले. यानंतर पराभवावर बोलताना खैरे यांनी सर्व खापर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि दुसरे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यावर फोडलंय. तर मतदारांनी त्यांना नाकारल्याचं उत्तर दानवे यांनी दिलंय. त्यामुळं पक्षातील दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा असलेला वाद चव्हाट्यावर आलाय.

दानवेंनी काम न केल्यानं पराभव : शिवसेनेच्या ठाकरे गट बालेकिल्ला म्हणून संभाजीनगर जिल्ह्याकडे पाहिलं जातं. त्यामुळं याठिकाणी ठाकरे निराश होणार नाहीत असा निकष लावत, विजय त्यांचाच होणार असा अंदाज जवळपास सर्वच राजकीय अभ्यासकांनी मांडला. 2019 मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवली, अन भाजपानं त्यांना छुपा पाठिंबा दिल्यानं मतांचं विभाजन झाल्याची चर्चा होती. त्यामुळं चंद्रकांत खैरे अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभूत झालं. त्यांनतर शिवसेनेत फूट पडली, यावेळी ठाकरे गटाला असलेली सहनभूती आणि त्यांना असलेला जनाधार यामुळं विजय खैरे यांचा होईल असं वाटत असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी अनपेक्षित पणे निवडणुकीत मुसंडी मारली आणि निकालाचं चित्र पालटलं. मात्र, हा पराभव विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी काम न केल्यानं झाल्याचा आरोप खैरे यांनी केलाय. दानवे प्रचार दरम्यान कार्यालयात जास्त आले नाहीत, त्यांनी व्यवस्थित प्रचार केला नाही तर तनवाणी यांनी आजाराचं कारण सांगून घरीच बसले असा आरोप खैरे यांनी केला.

दानवे - खैरे वाद पुन्हा पेटला : निवडणूक जाहीर झाल्यावर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत रस्सीखेच चालू होती. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोघांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. त्यावेळी दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. मात्र खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता आमच्यात कुठलाही वाद नाही, आम्ही पक्ष म्हणून काम करणार असं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलं. मात्र अंतर्गत धुसफूस चालूच होती. 2019 लोकसभा निवडणुकीत अंबादास दानवे यांनी उमेदवारी मिळवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र प्रस्थापित खासदार असल्यानं खैरे यांचेच पारडं त्यावेळी जड पडलं होतं. मात्र, त्यानंतर राजकीय सामाजिक समीकरण बदलल्यानं उमेदवार बदलावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली होती आणि त्यातूनच खैरे आणि दानव यांच्यात यांच्यात वाद सुरु झाले. आता पुन्हा एकदा खैरे यांनी पराभवाचं खापर दानवे यांच्या डोक्यावर फोडल्यानं आगामी काळात ठाकरे यांच्या या बालेकिल्ल्यात पक्षांतर्गत फूट पडणार का असा प्रश्न निर्माण झाला.

तनवाणी प्रचारात नव्हते : ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी हे उमेदवार प्रचारासाठी आले नाही. वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये तनवाणी यांना डावललं. त्यामुळं तनवाणी नाराज असल्यानं प्रचाराकडे त्यांनी कानाडोळा केला असं बोललं जातंय. तर दुसरीकडे तनवाणी हे आजारी असल्यामुळं त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळंच ते आले नाहीत असं तनवाणी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं, असं असलं तरी मात्र तनवाणी यांना देखील पराभवास जबाबदार पकडले असून याबाबत आपण मातोश्रीवर तक्रार करणार असल्याचं खैरे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. मतदारांनी वाजवली 'पिपाणी', अनेक ठिकाणी 'तुतारी'ला फटका - Lok Sabha Election Results 2024
  2. महाराष्ट्रात 48 खासदारांपैकी 26 नवे खासदार मराठा, तर 9 ओबीसी: वाचा संपूर्ण लिस्ट फक्त एका क्लिकवर.... - MP Equation Maharashtra
  3. रोहित पवारांचा अजित पवार यांच्या गटातील आमदार स्वत:कडे येण्याचा दावा पण स्वपक्षातील नेत्यांवरच संशय? - Rohit Pawar twitt

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.