मुंबई Ashish Shelar on Sanjay Raut : उबाठा सेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत काल आक्षेपार्ह विधान केलं होतं. संजय राऊत यांचं हे विधान पंतप्रधानांचा अपमान आणि बदनामी करणारे आहे. त्याहीपेक्षा संजय राऊत यांनी केलंल विधान हे प्रधानमंत्र्यांबद्दल विद्वेष पसरवणारं असल्यानं आम्ही निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यायची विनंती करू. तसेच संजय राऊत यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिलीय. आज मुंबईत ते बोलत होते.
याकूब मेमनचे थडगे सजवले गेले : याप्रसंगी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे ते पाहता जर का सवाल आक्रांत औरंगजेबी मानसिकतेचा असेल तर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला आमचा थेट सवाल आहेत. उद्धव ठाकरे आपण जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा याकूब मेमनचे थडगे सजवले गेले होते, मग याला तुम्ही औरंगजेबी मानसिकता म्हणणार की नाही? आमचा दुसरा सवाल थेट उद्धव ठाकरे यांना आहे, ज्या अफजल गुरूने भारताच्या संसदेवर हल्ला केला तेव्हा त्याच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये "अफजल तेरे कातिल जिंदा है.. हम शर्मिंदा है "असं म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र मुंबईमध्ये सभेला यायची परवानगी सुरुवातीला मिळाली होती की नाही? तर मग ही सुद्धा औरंगजेबी मानसिकता आहे की नाही ? याबाबत निवडणूक आयोगात आम्ही तक्रार करणार असल्याचंही आशिष शेलार म्हणाले.
औरंगजेबी मानसिकतेच्या लोकांची चलती : आमच्या भारतीय जनता पक्षानं तर अफजलखानाच्या कबरीचा बडेजाव उखडून टाकला. आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमुद्रा असलेलं बोधचिन्ह आमच्या संरक्षण दलाच्या झेंड्यावर चढवलं, गणवेशावर उमटवलं. संजय राऊत यांच्या डोक्यात तर छत्रपती शिवाजी महाराज कमी आणि अफझलखान आणि औरंगजेबच सतत असतात. म्हणूनच त्यांना अफझलखान आणि औरंगजेब वारंवार आठवत असतात. याच कारणासाठी उद्धव ठाकरे याचं सरकार असताना औरंगजेबी मानसिकतेच्या लोकांची चलती होत होती, हे महाराष्ट्रानें आणि संपूर्ण देशानं पाहिलं आहे, अशी शब्दात आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
हेही वाचा -