नागपूर : "निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपांची 11 महिने चौकशी केली. यात त्यांनी अनेकांचे जबाब नोंदवले. 1400 पानांचा अहवाल तयार करण्यात आला. मात्र, चांदीवाल आयोगाच्या अहवालात मी कुठंही दोषी नाही", असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका निवदेनातून म्हटलं आहे.
अनिल देशमुखांनी काय म्हटलंय? : चांदीवाल आयोगानं या प्रकरणाची चौकशी केली. त्यात माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे कोणतेही पुरावे मिळाले नाही. परमवीर सिंग यांना सहा वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी आले नाहीत. शेवटी त्यांचे अटक वॉरंट काढण्यात आले. तेव्हा परमवीर सिंग यांनी आयोगाला शपथपत्र लिहून दिलं. शपथपत्रात ते म्हणाले की, "माझ्याकडं कोणतेही पुरावे नाही. केवळ ऐकीव माहितीच्या आधारावरच मी अनिल देशमुखांवर आरोप केले." तसंच सचिन वाजेनं आयोगासमोर जबाबात सांगितलंय की, "अनिल देशमुख यांनी मला कधीही बार मालकाकडून पैसे गोळा करण्यासाठी सांगितलं नाही. तसंच माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा आयोगाच्या चौकशीमध्ये समोर आला नाही," असंही देशमुख म्हणालेत.
क्लीन चिट हा शब्द अहवालामध्ये... : "भलेही क्लीन चिट हा शब्द त्या अहवालामध्ये नसू शकतो. मात्र, संपूर्ण चांदीवाल आयोगाच्या अहवालात मला कुठंही दोषी धरण्यात आलेलं नाही. मी मागील दीड वर्षांपासून सातत्यानं 1400 पानांचा अहवाल हा जनतेसमोर आणण्याची मागणी भाजपा सरकारकडं करतोय. पण भाजपा सरकार मुद्दाम चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर येऊ देत नाही," असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय.
- माझ्या विरोधात पुरावे नाहीत : "मुंबई उच्च न्यायालयात माझ्यावरील आरोपांची केस जवळपास सात महिने चालली. त्यांनी निकालात असं म्हटलंय की, "संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केली असता आणि जबाब ऐकल्यानंतर अनिल देशमुख यांच्या विरुद्ध कोणतेही पुरावे आढळून आले नाही. तसंच ते या प्रकरणात कुठंही दोषी दिसत नाही", असं देशमुख यांनी सांगितलंय.
हेही वाचा-
- अनिल देशमुखांची चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? - Fadnavis Vs Deshmukh
- अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही; देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न, माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
- "आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानवर बलात्कार केला..."; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप - Anil Deshmukh On Devendra Fadnavis