ETV Bharat / politics

महाविकास आघाडीच्या बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जिंकण्याचा विश्वास - Amravati Lok Sabha - AMRAVATI LOK SABHA

Amravati Lok Sabha Constituency : अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज (30 मार्च) महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मविआचे अनेक नेते उपस्थित होते.

Amravati Lok Sabha Constituency Balwant Wankhade filed his candidature from Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीच्या बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 7:14 PM IST

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे

अमरावती Amravati Lok Sabha Constituency : महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात आज (30 मार्च) महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे बळवंत वानखडे (Balwant Wankhade Nomination Filed) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव गटाचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडीला विजयाचा आत्मविश्वास : अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी यावेळी निश्चितच विजयी होईल. तसंच आमचे सर्व मित्रपक्ष मिळून ही निवडणूक जिंकणार, असा विश्वास बळवंत वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन केलं असल्याचंही वानखडे यांनी सांगितलं. जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते माजी खासदार अनंत गुढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते.

प्रहारचा शिवसेनेसोबत संबंध नाही : शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी जिल्हाप्रमुख दिनेश बुब हे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे नेते अनंत गुढे म्हणाले, "दिनेश बुब यांचा हा वैयक्तिक निर्णय असून प्रहार आणि शिवसेनेचा कुठलाही संबंध नाही".

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या नेहरू मैदानात शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीची पहिली प्रचार सभा पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यासह महाविकास आघाडीतील सर्व नेते उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. सरपंच ते आमदार : अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडेंचा असा आहे राजकीय प्रवास - Lok Sabha Election 2024
  2. अभिजीत अडसूळ निवडणुकीच्या रिंगणात; "नवनीत राणांचा गेम करणार" - Amravati Lok Sabha Constituency
  3. अडसूळ, कडू यांचा विरोध असतानाही भाजपाकडून नवनीत राणांचं तोंड गोड - Amravati Constituency War

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.