ETV Bharat / politics

देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' मागणीनंतर भाजपामध्ये राजीनामासत्राला सुरुवात - BJP Workers Resign - BJP WORKERS RESIGN

BJP Workers Resign : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मला मंत्रिमंडळातून मोकळं करावं. मला पूर्णवेळ पक्षाचं काम करता येईल अशी मागणी केली. यानंतर एका भाजपा पदाधिकाऱ्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 8:14 PM IST

अमरावती BJP Workers Resign : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अमरावती शहर भाजपाचे अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं पाठवलाय.

ईमेल द्वारे पाठवला राजीनामा : मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण पोटे यांनी ईमेलद्वारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राजीनामा पाठवलाय. लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून अमरावती शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून तो स्वीकार करावा अशी विनंती देखील प्रवीण पोटे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं केलीय.

अमरावती भाजपा शहराध्यक्षांचा राजीनामा
अमरावती भाजपा शहराध्यक्षांचा राजीनामा (ETV Bharat Reporter)

नवनीत राणांच्या उमेदवारीला दर्शवला होता विरोध : अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा यांना भाजपानं उमेदवारी जाहीर करण्याच्या दोन दिवसांपूर्वीच भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून प्रवीण पोटे यांनी काहीही झालं तरी नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि प्रवीण पोटे यांच्यात गत दहा वर्षापासून राजकीय वैर आहे. मात्र रवी राणा यांनी माझ्या घरी येऊन माझी माफी मागितली. यामुळं आमच्यातला वाद संपुष्टात आला, असं खुद्द प्रवीण पोटे यांनी नवनीत राणा यांच्यासाठी प्रचार करताना म्हटलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याची हिंमत नवनीत राणा यांनी दाखवली. खरंतर ते काम आम्हाला करायला हवं होतं असं देखील प्रवीण पोटे म्हणाले होते. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला जात असतानाच नवनीत राणा यांचा पराभव झाल्यामुळं प्रवीण पोटे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय.

फडणवीसांची वरिष्ठांकडं मागणी : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाची मोठी पिछेहाट झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी "राज्यात लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये भाजापाच्या झालेल्या पराभवाची सगळी जबाबदारी माझी आहे. राज्यातील नेता म्हणून मी लोकसभा निवडणूक 2024 चं नेतृत्व करत होतो. मात्र पराभव हा पराभव असतो. त्यामुळं त्याची सगळी जबाबदारी माझी आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला तयारी करायची आहे. त्यामुळं मला मंत्रिमंडळातून मोकळं करावं. मला पूर्णवेळ पक्षाचं काम करता येईल" असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.